नमस्कार. 
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या ह्या अधिकृत संकेतस्थळावर आपलं स्वागत. १९४१ साली संघाची स्थापना झाली त्याला आता ७० वर्ष झाली. ह्या काळात अनेक चढ-उतार संस्थेने पाहिले. चढ-उतार हे नेहमी आर्थिक स्तरावरचेच असतात असं नाही. खरं तर तंत्रज्ञानाच्या निकषावरचे चढही आता क्रांतीकारी स्वरूपाचे असतात. ह्याच निकषामुळे आजच्या पत्रकारांच्या कामाचे स्वरूप एकीकडे बदलते आहे, तर दुसरीकडे पत्रकारितेच्या खोलवर रूजलेल्या वृक्षावर ‘वेब जर्नालिझम’ सारख्या नव्या शाखाही तयार होत आहेत. वृत्तपत्रे असोत की चित्रवाणी वाहिन्या, आपापली संकेतस्थळे वाचकांपुढे नियमित अपडेट ठेवून गेल्या दोन दशकात रूजलेल्या वेब माध्यमाचे स्वागत करीत आहेत. 

पत्रकारितेशी घनिष्ट संबंधित झालेल्या अशा ह्या वेब माध्यमाशी मुंबई मराठी पत्रकार संघासारखी संस्था जोडली जाणं अगदी स्वाभाविक आहे. तसं गेली काही वर्षे हे संकेतस्थळ इंटरनेटवर अस्तित्वात होतं. पण त्यावर फारच मोजकी पानं आणि वरवरची माहिती होती. ही स्थिती बदलावी आणि संकेतस्थळ समृद्ध करून जगापुढे सादर करावं हा निश्चय करून काम सुरू केलं. आज संकेतस्थळांवरील पानांची संख्या पूर्वीच्या तुलनेत दहा पटींनी वाढली आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो.

पत्रकार संघाच्या संकेतस्थळावर संस्थेचा इतिहास, सदस्यांबद्दलची माहिती, संस्थेत असलेल्या सोयी वगैरे मुलभूत माहिती असणं अपेक्षितच आहे. ती सर्व माहिती आपण संकेतस्थळावर विस्ताराने पाहू शकाल. पण त्या व्यतिरिक्त तीन विषयांचं एक माहितीपीठ संकेतस्थळावर उभं करावं असा प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येईल. ‘मुंबई’, ‘मराठी’ आणि ‘पत्रकारिता’ हे ते तीन विषय. त्यांचेशी संबंधित इंटरनेटवरील माहितीच्या दुव्यांची सर्वसमावेशक सूची देण्याची कल्पना राबवली गेल्याची आपल्याला दिसेल. यासाठी पत्रकार संघाचे सदस्य माधव शिरवळकर यांनी विशेष परिश्रम घेतले याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. दुव्यांची ही सूची ही कायम आणि अखंड विकासाची प्रक्रिया आहे. काही वेळा आज असलेले दुवे कालांतराने नाहीसे झालेले, किंवा त्यांचे पत्ते बदललेले असल्याचं आढळून येतं. किंवा, आज नसलेले नवे दुवे तयार झाल्याचं भविष्यकाळात दिसून येतं. यासाठी संकेतस्थळ अद्ययावत करीत राहण्याची मोठीच जबाबदारी आता सांभाळावी लागणार आहे. मात्र, हे काम कुणा एका माणसावर सोपवावं आणि मोकळं व्हावं असं मला वाटत नाही. नवी माहिती व नवे दुवे, किंवा जुने नामशेष झालेले दुवे यांची माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन आपणा सर्वांना करतो. हे आवाहन पत्रकार संघाच्या सदस्यांसाठी तर आहेच, पण जगभरात सर्वत्र पसरलेल्या तमाम मराठी बंधूभगिनींनाही त्यासाठी आवाहन करीत आहे. आपल्या सहकार्याने संकेतस्थळ अद्ययावत ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचं वचन पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून कर्तव्यबुद्धीच्या भावनेतून मी देत आहे. माझ्यानंतर येणारे पत्रकार संघाचे अध्यक्षही हे वचन पुढे नेत राहतील याचा मला विश्वास वाटतो.

   

संस्थेची अध्यक्ष परंपरा  

 • 001.jpg
 • 00001.jpg
 • 002.jpg
 • 003.jpg
 • 004.jpg
 • 005.jpg
 • 006.jpg
 • 007.jpg
 • 008.jpg
 • 009.jpg
 • 010.jpg
 • 011.jpg
 • 012.jpg
 • 013.jpg
 • 014.jpg
 • 015.jpg
 • 016.jpg
 • 017.jpg
 • 018.jpg
 • 019.jpg
 • 020.jpg
 • 021.jpg
 • 022.jpg
 • 023.jpg
 • 024.jpg
 • 025.jpg
 • 026.jpg
 • 027.jpg
 • 028.jpg
 • 029.jpg
 • 030.jpg
 • 031.jpg
 • 032.jpg
 • 033.jpg
 • 034.jpg
 • 035.jpg
 • 036.jpg
 • 037.jpg
 • 038.jpg
 • 039.jpg
 • 040.jpg
   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com