श्री. मनोहर गणेश देवधर

जन्म : २१ जून १९२८
पत्ता :  ३१/३२, शेफाली, मकरंद सहनिवास, वीर सावरकर मार्ग, माहीम, मुंबई - ४०० ०१६.
दूरध्वनी : २४४५ २१७९
शिक्षण : बी. ए., राष्ट्रभाषा कोविंद, राष्ट्रभाषा भाषारत्न,
व्यवसाय : १ ऑगस्ट १९४७ पासून वृत्तपत्र व्यवसायात. प्रारंभी आचार्य अत्रे यांच्याकडे, नंतर नवाकाळ दैनिकात काही महिने नोकरी. २० नोव्हेंबर १९४९ रोजी विद्याधर गोखले यांच्याबरोबर लोकसत्ता दैनिकात उपसंपादक म्हणून नोकरी. रविवार लोकसत्तेची तीन सदर संपादन करण्याचे काम. १९५९-१९६१ अशी तीन वर्षे लोकसत्ता दिवाळी अंकाचे संपादन, १९६२ पासून महाराष्ट्र टाइम्समध्ये रूजू उपसंपादक, प्रमुख उपसंपादक आणि शेवटी वृत्तसंपादक पदावरुन १९८८ साली निवृत्त.
त्यानंतर अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या 'बृहन्महाराष्ट्र वृत्त' या मासिकाचा भारतातील प्रतिनिधी म्हणून काम केले. त्यानिमित्ताने चार वेळा अमेरिकेची वारी करण्याची संधी मिळाली.
व्यावसायिक संधी : १९७५ साली लंडन टाइम्सच्या थॉपसन फाऊंडेशनच्या पत्रकारिता शिष्यवृत्तीसाठी निवड. ब्रिटनमध्ये सहा महिने मुक्काम. त्यावेळेस पश्चिम जर्मनीच्या निमंत्रणावरुन तीन आठवडे तेथे मुक्काम, विविध संस्था, संसद पुढारी, प्रेक्षणीय स्थळे यांच्या भेटीगाठी. पूर्ण जर्मनीलाही भेट.
पत्रकारितेतील कामगिरी : मुंबई मराठी पत्रकार संघाचा आजीव सभासद तीन वर्षे कार्यवाह आणि १९७६-७७ साली मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून निवड. आणीबाणी असल्यामुळे पत्रकारांवर बरीच बंधने होती. मराठी पत्रकार परिषदेचे आठ वर्षे बंद पडलेले काम पूर्ण सुरु करण्यात यश. १९७७ साली मुंबईत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अधिवेशन भरविले होते. त्याचा स्वागताध्यक्ष. इतर पत्रकारांच्या सहकार्यामुळे अधिवेशन यशस्वी. पत्रकार संघात सन्माननीय सदस्यात्वाची प्रथा सुरु केली. त्यामुळे वयोमानामुळे संघकार्यात भाग घेऊ शकत नसलेल्या परंतु पूर्वी पत्रकार संघाचे संस्थापक सदस्य असलेल्या पत्रकारांना त्यांच्या कार्याची पावती मिळाली.
साहित्य : कोंबडीची मुलाखत आणि इतर विनोदी लेखांचे पुस्तक. सॉलिसीटर के.बी. जोशी यांचे चरित्र, जादूची मधमाशी, राक्षसाची गोष्ट अशी दोन बालवाचकांसाठी पुस्तके व्यवसायानिमित्त विविध विषयांवर सुमारे दीडशे लेख प्रसिद्ध. आकाशवाणीवर नियमित कार्यक्रम. दूरदर्शनवरील बातम्यांचे भाषांतर आणि संपादन करण्याचे काम सुमारे पाच वर्षे. दूरदर्शन निवेदक, अनुवादक पदांसाठी झालेल्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका काढण्यात आणि उत्तरपत्रिका तपासण्यात मोठा सहभाग.
सन्मान : मराठी वृत्तपत्रव्यवसायात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कै. गो. भ. गुजर पुरस्काराने सन्माननीय. मराठी वृत्तपत्र संघातर्फे कै. य.कृ. खाडिलकर पुरस्काराने गौरव. मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई ग्रंथ संग्रहालय यांचा आजीव सभासद. भारत विकास परिषद या बिनसरकारी संस्थेचा काही काळ पदाधिकारी. २००२ साली इंडियन असोसिएशन ऑफ रिटायर्ड पर्सन्स या संस्थेचा अध्यक्ष म्हणून दोन वर्षांसाठी बिनविरोध निवड. त्यापूर्वी ३ वर्ष उपाध्यक्ष.
प्रवास : अमेरिका, केनिया-टान्झानिया, रशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड आणि हिंदूस्थानातील बहुतेक प्रदेशांना स्वखर्चाने भेट.
१९८८ साली निवृत्त झाल्यावर मुक्त पत्रकार म्हणून विविध दैनिके, साप्ताहिके आणि मासिकांतून लिखाण. मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई विद्यापीठाची गरवारे इन्स्टिट्यूट. के.सी. कॉलेजचा पत्रकारिता अभ्यासक्रम येथे अग्रलेख, अनुवाद, बातम्या आदी विषयांवर नियमित व्याख्याने दिली व देत आहे.

   

पत्रकार संघ अध्यक्ष परंपरा  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com