जागतिक माध्यम स्वातंत्र्यदिनानिमित्त..

Details

जागतिक माध्यम स्वातंत्र्यदिनानिमित्त...

मुंबई मराठी पत्रकार संघ आणि मुंबईतील अमेरिकन दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या जागतिक माध्यम स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम खूपच छान झाला. अमेरिकेचे माध्यम स्वातंत्र्य आणि रशियाचे कथित दुटप्पी धोरण यावर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातील जनसंपर्क प्रशिक्षण खात्याचे संचालक विल स्टिव्हन्स यांनी चांगले भाष्य केले. खोट्या बातम्या रोखण्यासाठी अचूकता आणि वास्तवता यावर कसा जोर देणे आवश्यक आहे हेही त्यांनी उदाहरणांसहित स्पष्ट केले. मुंबईतील पत्रकारांनी गुगल आणि देशातील सत्ताधा-यांचा माध्यमांवर असलेला अंकुश याबाबत विचारलेल्या प्रश्नांना विल स्टिव्हन्स यांनी अतिशय सोप्या शब्दांत उत्तरे दिली. मुंबईच्या अमेरिकी दूतावासातील  माहिती अधिकारी हैदी हॅटेनबॅक यांनी सुंदर समन्वय साधला. आम्ही पाहुण्यांचे स्वागत केले. दूतवासातील इतर माहिती अधिकारी ग्रेचेन क्रॅन्झईव्हान्स व सुमेधा म्हात्रे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप परिश्रम घेतले.

विनायक दळवी, संदीप कदम यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचे क्रीडा पुरस्कार जाहीर

Details

विनायक दळवी, संदीप कदम यांना
मुंबई मराठी पत्रकार संघाचे क्रीडा पुरस्कार जाहीर

येत्या 7 मार्चला इंजीनियर, वेंगसरकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण

 

मुंबई मराठी पत्रकार संघाने आपल्या पहिल्यावहिल्या क्रीडा पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा केली असून गेली 38 वर्षे क्रीडा पत्रकारितेत भरीव योगदान देणाऱया ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विनायक दळवी यांना पहिला महेश बोभाटे क्रीडा पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच दैनिक पुढारीचे क्रीडा पत्रकार संदीप कदम यांची ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्या जाणारा युवा क्रीडा पत्रकार पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. येत्या 7 मार्चला सायंकाळी 4 वाजता पत्रकार भवनात माजी कसोटीपटू फारूख इंजीनियर आणि दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते या क्रीडा पत्रकारांचा सत्कार केला जाईल.

दै. दिव्य मराठीत क्रीडा पत्रकार म्हणून कार्यरत असलेल्या विनायक दळवी यांनी गेली चार दशके निर्भीड पत्रकारिता करून मोठे योगदान दिले आहे. तसेच दळवी यानी लोकसत्ता आणि सकाळ या दैनिकांमध्ये 32 वर्षे क्रीडा संपादक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱया महेश बोभाटे यांच्या स्मरणार्थ हा पहिलावहिला पुरस्कार दिला जाणार आहे. दळवी यांना क्रीडा पत्रकारितेतील लिखाण आणि वार्तांकनाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

त्याचप्रमाणे अनेक दिग्गज क्रीडा पत्रकारांना घडविणाऱया ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मरणार्थ याच वर्षापासून देशी खेळांवर वार्तांकन आणि लिखाण करणाऱया युवा पत्रकाराला प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय मुंबई मराठी पत्रकार संघाने घेतला असल्याचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी आज जाहीर केले. त्या पुरस्कारासाठी गेली चार वर्षे स्थानिक पातळीवर होणाऱया देशी खेळांचे वार्तांकन करून युवा खेळाडूंच्या कलागुणांना न्याय देणाऱया युवा क्रीडा पत्रकार संदीप कदम यांच्या दमदार पत्रकारितेची दखल मुंबई मराठी पत्रकार संघाने घेतली. गेली चार वर्षे पुढारी दैनिकात क्रीडा उप संपादक म्हणून कार्यरत असलेल्या संदीप कदम यांच्याकडे वृत्तवाहिनीत काम केल्याचाही दांडगा अनुभव आहे. कदम यांना नुकताच मनोहर विचारे प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

क्रीडा पत्रकारांसाठी पुरस्कार दिला जाणार...

Details

क्रीडा पत्रकारांसाठी पुरस्कार दिला जाणार..

ज्येष्ठ पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देशी खेळांवर लिहिणा-या क्रीडा पत्रकारांसाठी पुरस्कार दिला जाणार आहे. त्यासाठी मोरे यांचे ज्येष्ठ पुत्र अश्विन मोरे यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघाला एक लाखाचा धनादेश दिला... लवकरच या पुरस्काराची घोषणा केली जाईल.

मुंबई मराठी पत्रकार संघात अर्थसंकल्पावर परिसंवाद...

Details

मुंबई मराठी पत्रकार संघात अर्थसंकल्पावर परिसंवाद...

मुंबई मराठी पत्रकार संघ आणि ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, मंगळवार दिनांक 6 रोजी सायं. 5.30 वाजता पत्रकार भवन, आझाद मैदान येथे केंद्रीय अर्थसंकल्पावर मान्यवरांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
स्नेहल मुजुमदार, अनिल हरीश, डॉ. एस. एन. पठाण, श्री. प्रवीण लुंकड, डॉ. नीलम गोऱ्हे, महेश मुद्दा आणि सुभाष सराफ हे वक्ते अर्थसंकल्पाच्या विविध पैलूंवर आपले विचार मांडणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यवाह श्री. संदीप चव्हाण यांनी केले आहे.

सिडकोने पत्रकारांसाठी राखीव असलेल्या पनवेल येथील भुखंडासंदर्भातील मुदत वाढविण्याविषयी निवेदन..

Details

सिडकोने पत्रकारांसाठी राखीव असलेल्या
पनवेल येथील भुखंडासंदर्भातील मुदत वाढविण्याविषयी निवेदन..

सिडकोने पत्रकारांसाठी राखीव असलेल्या पनवेल येथील भुखंडासंदर्भातील जाचक अटी रद्द कराव्यात आणि निविदा अर्ज स्विकारण्याची मुदत दि. १० मार्चपर्यंत वाढवावी अशी मागणी करणारे निवेदन मुंबई मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने आज सिडकोचे एमडी श्री. भूषण गगराणी यांना दिले. श्री. गगराणी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. आता पुढील बैठक मा. मुख्यमंत्री यांच्याबरोबर लौकरच होईल. आनंदाची बातमी देखील लौकरच मिळेल. छायाचित्रात डावीकडून कार्यकारिणी सदस्या स्वाती घोसाळकर, अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे , श्री. गगराणी आणि उपाध्यक्ष सुधाकर काश्यप दिसत आहेत.

   

पत्रकार संघ अध्यक्ष परंपरा  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com