ग. का. रायकर ( १९८३-८४)

श्री. ग. का. रायकर
'जय हिंद प्रकाशन' आणि 'श्रीदीपलक्ष्मी' मासिक यांचे संस्थापक आणि संवर्धक
रत्नागिरी स्कुल बोर्डात प्राथमिक शिक्षकाची नोकरी करत असताना त्यांनी 'श्रीलोकमान्य', 'नवाकाळ', 'बलवंत', 'सत्यशोधक' इत्यादी वृत्तपत्रांचा स्थानिक बातमीदार म्हणून काम पाहिले. त्याच काळात 'दिवाळीची देणगी' आणि 'अंगाई गीते' या दोन पुस्तकांचे संपादन केले. त्यांनी श्रीमद्भागवद्गीतेचा सर्वागीण अभ्यास केला. त्यातून 'सार्थ श्रीमद्भागवद्गीता' हा ग्रंथ तयार झाला. या ग्रंथाच्या आवृत्त्या दरवर्षी प्रसिद्ध होत असून आजपर्यंत किमान ४ ते ५ लाख प्रतींची विकी झाली आहे. तसेच इतही अनेक पुस्तके लिहीली. मध्यंतरी मोडी लिपीच्या पुनरुज्जीवनसाठी काही लोकांनी प्रयत्न सुरु केले. तेव्हा वयाचा विचार न करता रायकरांनी मोठ्या हुरुपाने त्यांना सर्वतोपरी सहकार्य दिले.
रायकर पहिल्यापासूनच अनेक सामाजिक शैक्षणिक आणि साहित्यिक संस्थांचे आजीव सभासद किंवा देणगीदार होते. पण या सर्व संस्थांमध्ये त्यांचा खरा जीव होता तो मुंबई मराठी पत्रकार संघावर. मुंबई मराठी पत्रकार संघाचे ते अनेक वर्ष सभासद होते. एका वार्षिक सभेत श्री. दि. वि. गोखले यांनी त्यांचे नाव कोषाध्यक्षपदासाठी सुचवले आणि ते सर्वमान्य होऊन ते 'कोषाध्यक्ष' म्हणून निवडूनही आले. आपल्या मनमिळाऊ, आर्जवी आणि निरहंकारी वृत्तीमुळे त्यांनी सर्वांना आपलेसे केले आणि परिणामी एकूण २६ वर्षे ते पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष, एक वर्ष अध्यक्ष आणि नंतर दहा वर्षे विश्वस्त म्हणून राहिले.

   

पत्रकार संघ अध्यक्ष परंपरा  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com