प्रसार माध्यमांकडून आमच्या अपेक्षा पत्रकार दर्पण दिवाळी अंकाची लेख स्पर्धा...

Details

प्रसार माध्यमांकडून आमच्या अपेक्षा
पत्रकार दर्पण दिवाळी अंकाची लेख स्पर्धा...

मुंबई मराठी पत्रकार संघाने यंदाच्या आपल्या 'पत्रकार दर्पण' दिवाळी अंकासाठी 'प्रसार माध्यमांकडून आमच्या अपेक्षा' या विषयावर लेख स्पर्धा जाहीर केली असून पहिल्या क्रमांकासाठी रु. १०००/-, दुस-या क्रमांकासाठी रु ७००/- व तिस-या क्रमांकासाठी रु. ५००/- अशी रोख पारितोषिके ठेवली आहेत. शिवाय उत्तेजनार्थ प्रत्येकी २५०/- रुपयांची पाच रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. सध्याच्या माहितीच्या महास्फोटाच्या काळात, सुसाट धावणा-या 'सोशल मीडिया' ने पारंपारिक प्रसार माध्यमांपुढे मोठेच आव्हान निर्माण केले आहे, अशी अनेकांची धारणा आहे. त्यात कितपत तथ्य आहे? प्रसार माध्यमे ही समाजाला त्याचे प्रतिबिब दाखविणारा आरसा असतात. पण आज प्रसार माध्यमांत समाजाचे खरेखुरे प्रतिबिंब उमटते का, समाजाचे प्रबोधन करीत त्याला प्रगतीपथावर नेण्याचे काम वृत्तपत्रे प्रामाणितपणे करीत आहेत का आदि मुद्यांचा लेखांत उहापोहा असावा अशी अपेक्षा आहे. ही स्पर्धा पत्रकार संघाच्या सदस्य / सहसदस्य यांच्या खेरीज सर्वांना खुली असून कमाल १००० शब्द मर्यादेतील आपला लेख टाईप करुन This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या ईमेल पत्त्यावर दि. १० ऑक्टोबर २०१८ पर्यंत पाठवावा असे पत्रकार संघाचे कार्यवाह संदीप चव्हाण यांनी आवाहन केले आहे. या स्पर्धेसंबंधात कसलाही पत्र व्यवहार केला जाणार नाही तसेच मुंबई मराठी पत्रकार संघाच स्पर्धाबाबतचा निर्णय अंतिम राहील. असेही स्पष्ट करण्यात आले आहे. स्पर्धेचा निकाल व पारितोषिक विजेते लेख 'पत्रकार दर्पण' च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध होतील.

१५० व्या महात्मा गांधी जयंती समारोहाचा डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते शुभारंभ होणार

Details

मुंबई मराठी पत्रकार संघाचा उपक्रम

१५० व्या महात्मा गांधी जयंती समारोहाचा
डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते शुभारंभ होणार


महात्मा गांधी शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त मुंबई मराठी पत्रकार संघाने, जळगावचे गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि मुंबईचे गांधी फिल्म फाऊंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. गांधी जयंती समारोहाचा शुभारंभ ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते शनिवार, दि. २९ सप्टेंबर २०१८ रोजी दुपारी ४.०० वाजता पत्रकार संघाच्या `पत्रकार भवनात' होणार आहे. या प्रसंगी गांधी विचारांचे ज्येष्ठ अभ्यासक श्री. रामदास भटकळ, डॉ. भूजंगराव बोबडे, मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तारचे संचालक डॉ. दिलीप एस. पाटील आदी मान्यवरांचीही भाषणे होणार आहेत. `सिलेज : नव्या युगातील ग्रामीण विकासाचा ज्ञानसेतू' या विषयावर डॉ. काकोडकर यांचे व्याख्यान होईल तर `गांधींचा आतला आवाज' हा श्री. भटकळ यांच्या भाषणाचा विषय आहे. `गांधी समजून घेताना'च्या अनेक संभ्रमाचे डॉ. बोबडे त्यांच्या भाषणातून निरसन करतील. तर डॉ. पाटील `सद्यकाळात महात्मा गांधी विचारांचे महत्व' विशद करतील.

हा समारोह उद्घाटन सोहळा सर्वांना खुला असून विद्यार्थी-युवकांनी तसेच गांधी विचाराच्या अभ्यासकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे पत्रकार संघाचे कार्यवाह संदीप चव्हाण यांनी आवाहन केले आहे.

आचार्य अत्रे पुरस्कार दैनिक नवशक्तीचे संपादक श्री सुकृत खांडेकर

Details

आचार्य अत्रे पुरस्कार दैनिक नवशक्तीचे संपादक श्री सुकृत खांडेकर यांना प्रदान..

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे देण्यात येणारा आचार्य अत्रे पुरस्कार दैनिक नवशक्तीचे संपादक श्री सुकृत खांडेकर यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यातआला त्यावेळी सोबत नरेंद्र वाबळे , संदीप चव्हाण,अजय वैद्य  तसेच संघातर्फे ज्येष्ठ सदस्य सन्मान योजनेचा शुभारंभ शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ज्येष्ठ सदस्यांना धनादेश वितरित
करून करण्यात आलाकरण्यात आला

शिर्डीचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे मुंबई मराठी पत्रकार संघात...

Details

शिर्डीचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे मुंबई मराठी पत्रकार संघात...

ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि श्री साईबाबा संस्थान, विश्वस्त व्यवस्था, शिर्डीचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी शिर्डी संस्थानात अनेक चांगले बदल घडवून आणले आहेत. भक्तीला विज्ञानाची जोड देत त्यांनी तेथे अनेक चांगले उपक्रम राबविण्यास प्राधान्य दिले आहे. मंदिर व्यवस्थापनाला एक नवे परिमाण देणाऱ्या डॉ. हावरे यांचा वार्तालाप कार्यक्रम मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केला आहे. शुक्रवार, दि २४ ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी ४ वा. पत्रकार भवन, आझाद मैदान, मुंबई येथे हा कार्यक्रम होणार असून, तो पत्रकार व अन्य इच्छुकांनाही खुला असल्याचे पत्रकार संघाचे कार्यवाह संदीप चव्हाण यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघ ज्येष्ठ सदस्य सन्मान योजनेचा शुभारंभ

Details

आचार्य अत्रे जयंतीच्या दिवशी
मुंबई मराठी पत्रकार संघ ज्येष्ठ सदस्य सन्मान योजनेचा शुभारंभ...

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या 65 वर्षांवरील सेवानिवृत्त सदस्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या `मुंबई मराठी पत्रकार संघ ज्येष्ठ सदस्य सन्मान योजने'चा शुभारंभ आचार्य अत्रे जयंतीच्या दिवशी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते धनादेश वाटपाने होणार आहे. सोमवार दि. १३ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ११.३० वाजता पत्रकार भवन, आझाद मैदान येथे होणाऱ्या या कार्यक्रमास राज्याचे उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी ६५ वर्षांवरील संघाच्या निवृत्त सदस्यांना पूर्वलक्षी प्रभावाने, मार्च २०१८ पासून, प्रत्येकी रु. ६०००/- चा धनादेश सन्मान योजनेतून दिला जाणार आहे. सध्या दरमहा रु. १२००/- या सदस्यांना देण्यात येणार असून भविष्यात या रकमेत घसघशीत वाढ करण्याचा निर्धार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी व्यक्त केला आहे.

   

पत्रकार संघ अध्यक्ष परंपरा  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com