भारतकुमार राऊत

Details

जन्म, शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मुंबई झाले.

राज्यशास्त्र विषय घेऊन मुंबई विद्यापीठाची बी. ए. ( ऑनर्स ) पदवी घेतल्यानंतर एम.ए.साठी मुंबई विद्यापीठाची स्कॉलरशिप व युनिव्हर्सिटी ग्रॅट्स कमिशनची फेलोशिप मिळाली.

महाविद्यालयीन जीवनातच वृत्तपत्रीय कारकिर्दीला सुरुवात मुंबई सकाळ, मुंबई दूरदर्शन, महाराष्ट्र टाइम्स अशा नोक-या केल्यानंतर १९८३ मध्ये इंग्रजी पत्रकारितेत प्रवेश. द. इव्हिनिंग न्यूज ऑफ इंडिया, फ्री प्रेस जर्नल, द इंडियन पोस्ट आदी इंग्रजी वृत्तपत्रात विविध जबाबदारी या पदांवर काम केल्यावर टाइम्स गटा या द इंडिपेंडेण्ट या वृत्तपत्रा या कार्यकारी संपादकपदी निवड. त्यानंतर त्याच गटा या द मेट्रोपोलिस ऑन सॅटरडे या साप्ताहिक वृत्तपत्राचा पहिला कार्यकारी संपादक. नंतर द पायोनियर या दिल्लीतील दैनिका या मुंबई आवृत्तीचा स्थानिय संपादक.

१९९५ मध्ये झी टेलिफिल्म्सचा क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून नेमणूक. झी न्यूज या वृत्तवाहिनीची स्थापना केली. नंतर 'झी' या युरोप व अमेरिका चॅनल्स या स्थापनेसाठी साडेचार वर्षे इंग्लंड व अमेरिका देशात वास्तव्य. डिसेंबर २००० पासून पुन्हा महाराष्ट्र टाइम्समध्ये आधी कार्यकारी संपादक व पुढे ६ एप्रिल २००८ पर्यंत संपादक म्हणून. या काळात महाराष्ट्र टाइम्स, ए.बी.सी. सर्वेक्षणानुसार महामुंबई क्षेत्रात सर्वाधिक खपाचे मराठी दैनिक बनले. सद्या टाइम्स ग्रुपचे संपादकीय सल्लागार म्हणून कार्यरत..

१९८७-८८ मध्ये मुंबई मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष. याच काळात पत्रकार संघा या आझाद मैदानातील भवनाची कोनशीला बसवण्यात आली.

'अंधारातील एक प्रकाश' हे कै. जयप्रकाश नारायण यांचे चरित्र, दृष्टीकोन, असा दृष्टिकोन, नायक, शिवसेना : हार आणि प्रहार ही पुस्तके प्रकाशित झाली.

पहिला राम मनोहर त्रिपाठी पत्रकार पुरस्कार व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा सर्वोच्च कै. बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता जाहीर झाला. २००३ चा जायट्स इंटरनॅशनलचा जर्नालिस्ट ऑफ द इयर पुरस्कार, मुंबई मराठी पत्रकार संघाचा २००४ या पुढारीकार ग. गो. जाधव स्मृती पत्रकारिता पुरस्कार मिळाला. याशिवाय स.मा.गर्गे पत्रकारिता पुरस्कार व आशीर्वादचा हरिवंशराय बच्चन पुरस्काराचाही मान मिळाला. 'असोसिएशन ऑफ बिझिनेस कम्युनिकेटर्स' चा २००६ चा ' बेस्ट बिझिनेस जर्नालिस्ट पुरस्कार. राज्यसभेवर खासदार म्हणून १९ मार्च २००८ रोजी बिनविरोध निवड.

पत्ता : १२०१, रामगिरी हाइट्स, एम. टी. एन. एल. मार्ग, दादर, मुंबई ४०० ०२८.
email : This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

   

पत्रकार संघ अध्यक्ष परंपरा  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com