श्री. अजय वैद्य

मराठी वृत्तपत्रसुष्टीच्या पावणे दोनशे वर्षांच्या काळात असंख्य पत्रकारांनी योगदान दिले. या प्रदीर्घ प्रवासातील आपण पांथस्थ लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची तन-मन-धन अर्पून सेवा केलीत. घर संसार न पाहता पत्रकारितेच्या प्रतिष्ठेसाठी आपल्यातील वार्ताहर विश्रांत श्रमला. घड्याळाच्या अखंड गतीप्रमाणे पत्रकार हितासाठी कर्मयोगी योगदान दिले. राज्यकर्ते-वृत्तपत्र आणि वाचक यांच्यातील सोनेरी, दुवा असेच आपले कार्य राहिले. सत्तेवर असलेल्यांच्या चुका निर्भिडपणे दाखविल्या. तसेच चांगल्या कार्याचे कौतुक करताना लेखणी आखडती घेतली नाहीत.

सिल्व्हासा या केंद्रशासित प्रदेशातील खानदानी जमिनदार कुटुंबातील आपण. जन्म १७ ऑगस्ट १९५२ रोजी ठाणे शहरात आजोळी झाला. पत्रकारितेचे बाळकडू वडील शरद वैद्य यांच्या कडूनच लाभले. ते पत्रकार-साहित्यिक-गीतकार होते. मराठी, गुजराती, हिंदी व इंग्रजी अशा चारही भाषांत लेखन करीत. रेडिओवर त्यांची गीते व नाटके गाजली होती. आचार्च अत्रेंच्या दैनिक मराठात ते संपादकीय पान पहात. आपले पत्रकारितेचे ते गुरु प्रसिद्धिच्या मागे कधीही नव्हते. तोच स्वभाव आपला शालेय जीवनापासून राहिला. शिक्षण अंधेरी महापालिका शाळा व विद्याविकास मंडळ हायस्कूलमध्ये झाले. सातवीपर्यंत पहिला क्रमांक, वक्तृत्वाची अनेक बक्षिसे, आदर्श विद्यार्थी पुरस्कार, एस.एस.सी. ला गणितात शंभर पैकी शंभर गुण. 'निरोप' या कुसुमाग्रजांच्या कवितेचे सहावी इयत्तेत केलेले रसग्रहण गाजले. आरंभ चित्रमय आणि शेवट नाट्यमय असल्याचे कौतुक तेंव्हा झाले होते. शाळा कॉलेजात नाटकातूनही भूमिका केल्या. त्यापैकी एका नाटकात पत्रकारांची भूमिका नावाजली गेली. पत्रकारितेच्या मार्गावरील पावले अशी उमटत होती. त्यामुळेच पदार्थ विज्ञान-गणित हा विषय घेवून भवन्स मधून एस.एस.सी झाल्यावरही पत्रकारिताक्षेत्र खुणावित होते.

वडिलांचे स्नेही मोठे मोठे पत्रकार घरी येत असत. त्यावेळच्या चर्चेतून जडण घडण होत गेली. घरच्याच नेशन वाईड इन्फामेशन ब्यूरो -- सर्व्हिसमधून आपली सुरुवात झाली. १९६९ साली वार्ताहर म्हणून हिंदुस्थान समाचार एजन्सीत रुजू झालात. लेखी परीक्षेसाठी लेली पाहिलीच बातमी लोकसत्तेत छापून आली. एजन्सीमुळे मराठी सोबत हिंदीतूनही पत्रकारिता सुरु झाली. लोकसत्ता, नवाकाळ, नवभारत टाइम्स, दिल्लीचा हिंदुस्थान दैनिकांतून बातम्या छापून येत होत्या. त्यापैकी अनेक हेडलाइन्स ठरल्या. कोर्ट, क्राईम, महापालिका, मंत्रालय अगदी कला क्रीडा साहित्य सर्वच बीट्सवर आपली पत्रकारिता सुरु होती. गाजलेले अंतुले काळातील सिमेंट प्रकरण, १९८२ ची वर्ल्ड हॉकी स्पर्धा, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, काँग्रेसच शताब्दी अधिवेशन, तसेच भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेचे कव्हरेज केलेत. त्याकाळी १० वाजता क्राइम रिपोर्टिंग, दुपारी १२.०० वा मंत्रालय, रात्री १२ वाजेपर्यंत कार्यालयात असा दिनक्रम होता. सर्वच क्षेत्रात मोठ्या -- या काळात महाराष्ट्रात घडत होत्या. मदर इंडिया नर्गिस, राजकपूर ही सिने क्षेत्रातील, वसंतदाद पाटील, यशवंतराव चव्हाण ही राजकीय क्षेत्रातील लोकोत्तर व्यक्तिमत्वे हरपली. त्याचे वृत्तसंकलन केलेत. अंतुले ते अशोक चव्हाण या सर्व मुख्यमंत्र्यांच्या राजभवनावरील शपथविधींना पत्रकार म्हणून साक्षीदार होतात. मुंबई तोडण्याचा प्रयत्न हाणून पाडू हे वसंतदादांचे ऐतिहासिक उद्गार आपल्यामुळेच देशभर पोहचले.

राजकीय वार्ताहर म्हणून कारकीर्द ख-या अर्थाने बहरली. अंतुलेंचे उत्तराधिकारी 'बाबासाहेब' भोसले ही बातमी सर्वप्रथम आपण दिली ती रेडिओवरुन जाहीर झाली. संजय गांधी निधनानंतर शिवसेनेचा बंद ही बातमी देशभर गाजली. शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिक्रिया त्यांच्या विषयावर घेण्याची सुरुवात आपल्यामुळे झाली. त्या देशभरच्या वृत्तपत्रात येत राहिल्या. रमेश प्रबू निवडणूक खटल्यात आपली साक्षि पत्रकार म्हणून महत्वाची मानली गेली. विधानपरिषद सतत ३० वर्षे कव्हर करताना रा. सु. गवई ते शिवाजीराम देशमुख सर्वच आपतींचा काळ पाहिलात.

मुंबई मराठी पत्रकार संघ, प्रेस क्लब, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ या संघटनांवर महत्त्वाची पदे भूषविलीत. बिहार प्रेस च्या विरोधात दिल्ली मोर्चात सहभाग होता. अनेक दिग्गज नेत्यांशी आपले संबंध उत्तम राहिले. इंदिरा गांधी राजीव गांधी यांना विमानाच्या मुद्यांवर प्रश्नोत्तरे करण्याची संधी आपणास मिळत असे. पत्रकार संघ अध्यक्ष असताना आझाद मैदानावर सीमाप्रश्नसंबंधी पत्रकार, साहित्यिक मेळावा घडवून आणलांत. संयुक्त महाराष्ट्राचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असंख्य सत्याग्रहींनी त्या रणसंग्रामात रक्त सांडले. एक -- म्हणून आपणही तेव्हा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ! ही घोषणा देत होतात. पोलिसांच्या अत्याचारात अंधेरीतही सत्याग्रहींवर ठीमार झाला. त्यावेळी या बालकाचेही रक्त सांडल्याची आठवण आजही रोमांचित करते.

साहेब, आपल्या पत्रकार बंधूंना घरे मिळावीत यासाठी पत्रकार संघ आणि मंत्रालय वार्ताहर संघाच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील राहिलात. तत्कालनि मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करुन मुंबई १२५ पत्रकारांना स्वस्त दरात म्हाडा सदनिका मिळविण्यात आपले योगदान महत्त्वपूर्ण होते. आझाद मैदानात पत्रकार संघाची भव्य वास्तू उभारण्यात मोलाचा वाटा राहिला. पत्रकार संघात पाण्याची सोय मिळविण्यात आपले अथक प्रयत्न यशश्वी ठरले. मराठी पत्रकारांची नवी पिढी घडावी यासाठी पत्रकार संघात पत्रकारिता अभ्यासक्रम आपल्याच अध्यक्षपदाच्या काळात सुरु झाला.

- निर्भय पाथिक , दैनिक सामना, हिंदुस्थान समाचार, लोकमत, तरुण भारत ते महावृ्त असा प्रवास झाला. ३५ वर्षानंतरही आजही लेखणी थांबली नाही. समाजाला दिशा देण्याचे काम करतानाच शासनातील मंत्र्यांना परखड प्रश्न विचारतांना परिणामांची पर्वा केली नाहीत. त्या नव्या पत्रकारांमधील दुवा असलेले आपण संघर्षमय वाटचाल करीत आहात. स्वत:चे कटू अनुभव विसरुन इतरांच्या चेह-यावर हसू लाविण्याचे प्रयत्न करीत आहात. मराठी वृत्तपत्र सृष्टीला दिलेले हे योगदान पुढील पिढ्यांना प्रोत्याहित करीत राहील यात शंका नाही. --- विषयी आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो.

   

पत्रकार संघ अध्यक्ष परंपरा  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com