प्रसाद मोकाशी ( २००९-२०११)

श्री. प्रसाद प्रफुल्लकुमार मोकाशी

- मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबईचे अध्यक्ष श्री. प्रसाद प्रफुल्लकुमार मोकाशी हे गेली २५ वर्षे पत्रकारितेत असून त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आजवर विविध पदे भूषविली आहेत. अध्यक्षपदी
( २००९-२०११ ) निवडून येण्यापूर्वी ते पत्रकार संघाचे आठ वेळा कार्यवाह होते.

- मुंबई मराठी पत्रकार संघ ही ६९ वर्षांची, जुनी बृहन्मुंबईतील मराठी भाषिक तसेत मराठी प्रसिद्धी माध्यमांत ( वृत्तपत्रे, रेडिओ, दूरचित्रवाहिनी इ. ) कार्यरत असणा-या पत्रकारांची प्रातिनिधिक सांस्कृतिक संघटना आहे.

- श्री. प्रसाद प्रफुल्लकुमार मोकाशी यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करतानाच १९८५ मध्ये मुंबई येथील दै. शिवनेर मधून पत्रकारितेस आरंभ केला.  इतिहास आणि राज्यशास्त्र हे विषय घेऊन त्यांनी मुंबई विद्यापीठीची बी. ए. पदवी १९९० या वर्षी प्राप्त केली.

- १९८६ साली 'विनोदी झरोके' या दिवाळी अंकाद्वारे संपादन - प्रकाशन क्षेत्रात प्रसाद मोकाशी यांनी यशस्वी पदार्पण केले. 'विनोदी झरोके' सलग तीन वर्षे प्रकाशित केला. याच दरम्यान, पद्मविभूषण कै. रुसी करंजिया यांच्या 'ब्लिटझ्' या साप्ताहिकाच्या मराठी आवृत्तीत त्यांनी उपसंपादक वार्ताहर म्हणून काम पाहिले. सुमारे ५ वर्षे 'ब्लिट्झ' मध्ये काम केल्यानंतर १९९१ मध्ये प्रसाद मोकाशी, मराठीतील अग्रगण्य दैनिक लोकसत्तामध्ये उपसंपादक वार्ताहर पदावरुन रुज झाले. तेव्हापासून आजतागायत दै. लोकसत्तामध्ये कार्यरत आहेत. या काळात त्यांनी या वृत्तपत्रात विविध पदांवर विविध जबाबदारीची कामे यशस्वीरीत्या सांभाळली. सध्या  ते लोकसत्तामध्येच  वरिष्ठ वार्ताहर म्हणून काम करतात.

- सध्या लोकसत्तामध्येच संपादकीय पानाची संपूर्ण जबाबदारी सांभाळतात.

- विविध सामाजिक राजकीय विषयांवर त्यांनी आजवर सुमारे ३०० प्रासंगिक लेख लिहिले असून विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली तर काही वेळा या प्रश्नांचे विश्लेषण केले. १९९२-९३ मध्ये मुंबईत झालेल्या जातीय दंगलीचे, तसेच १९९७ मध्ये मुंबईतच रमाबाई आंबेडकर नगरमध्ये झालेल्या दंगलीचे प्रत्यक्ष वृत्तांकन त्यांनी केले. शिवसेना आणि रिपाइं (आर. पी. आय.) या पक्षांच्या कार्यकर्त्यांत झालेल्या दंगलीचेही वृत्तांकन त्यांनी केले होते.

- या खेरीज त्यांना ललित लेखनाचे अंग असून विविध दिवाळी अंकांत तसेच लोकसत्ता पुरवणीसाठी दिवाळी अंकातूनही प्रसाद मोकाशी यांच्या कथा आणि ललित लेख प्रकाशित झाले आहेत.

- आकाशवाणीसाठी श्रृतिका-वृत्तविभागात १९९३ पासून दूर गुरुवारी ते प्रासंगिक समीक्षा सादर करतात.

- प्रसाद मोकाशी यांचे कथा कथनाचेही अनेक कार्यक्रम सादर केले आहेत.

- मुंबईमधील कुर्ला विभागातील सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक संस्थांशीही त्यांचे घनिष्ठ संबंध  आहेत.

   

पत्रकार संघ अध्यक्ष परंपरा  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com