श्री. निळकंठ खाडिलकर


नीलकंठ यशवंत खाडीलकर
जन्म : ६ एप्रिल १९३४
शिक्षण : बी. ए. ऑनर्स (संपूर्ण अर्थशास्त्र)

संस्था :
- मुंबई मराठी पत्रकार संघाचे पुनरुज्जीवन, पत्रकार संघाचे दोनदा अध्यक्ष आणि विश्वस्त
- भाषिक वृत्तपत्र संस्थेचे 'ILNA' चिटणीस
पत्रकारिता : महाराष्ट्राचे अग्रगण्य दैनिक 'नवाकाळ'चे तिस-या पिढीतील संपादक, पत्रकारितेतील विक्रमादित्य झाले. एक दंतकथा बनले. खास वृत्तांत, मथळे व मुलाखती गाजविल्या.

जीवनपट
निवडक पदव्या व पारितोषिके
विविध क्षेत्रांत चमकणारी मान्यता मिळविली. अनेक पारितोषिके व सन्मान देण्यात आले. निवडक असे -
- महात्मा गांधी, राजे शिवाजी, श्रीकृष्ण, रामायण, संत तुकाराम, मराठी व सत्यमेव जयते ही 'खिशात मानणारी व खिशाला परवडणारी' सात पुस्तके सादर केली. राजे शिवाजी पुस्तकाचा खप तीन लाख झाला आणि अन्य पुस्तकांचा किमान पाऊण लाख झाला. साहित्यात विक्रम झाला. भारतीय संस्कृतीचा झेंडा डौलत ठेवला. एकूण ३४ पुस्तके लिहिली.
- अग्रलेखांचे बादशहा : जनतेने दिलेली पदवी
- पद्मश्री : राष्ट्रपती संजीव रेड्डी यांच्या हस्ते १९९२ साली
- महाराष्ट्र सरकारतर्फे पत्रकारितेसाठीचा पहिला लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार - सप्टेंबर २००८. "चौफेर" क-हाडतर्फे 'सुधारक'कार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार - ६ ऑगस्ट २०११
- मराठी : या विषयावरील खास पुस्तक सादर केले आणि मराठी भाषेच्या अग्रगण्य स्थानासाठी प्रभावी प्रयत्न केले.
- सुवर्णपदक : कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांचे 'नाट्याचार्यांची नाट्यकला" ग्रंथाबद्दल खास सुवर्णपदक
- ना. यशवंतराव चव्हाणांनी जाहीर सभेत केलेली प्रशंसा आजोबांचा ( कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर) नातू शोभतो.
- आचार्य अत्रे अॅवॉर्ड : मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे
- सर्वोत्कृष्ट अग्रलेख : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे खास पारितोषिक.
- खपाचा विक्रम : 'नवाकाळ'चा खप एक हजार होता. आगाऊ जाहीर करुन हा खप साडेतीन लाखांहून अधिक केला. एबीसी प्रमाणपत्रानुसार खपात व लोकप्रियतेत दोन रुपयांच्या पेनने भांडवलशाही वृत्तपत्रांवर सरळ मात केली. जास्तीत जास्त सात लाख खपाचा आजतागायत न मोडलेला विक्रम केला.
- व्होरा प्राईझ : सर्वोत्तम वृत्तांत लेखनाबद्दल
- मुंबई विद्यापीठाचे बुद्धिबळ चॅम्पियन : स्वत:च्या तिघाही कन्यांना बुद्धिबळ शिकविले. तिघीही वयाच्या १३ व्या वर्षी नॅशनल चॅम्पियन जागतिक संघटनेने तिघींना इंटरनॅशनल मास्टर ही पदवी दिली. त्या खाडीलकर सिस्टर्स म्हणून देशात व जगात प्रसिद्ध झाल्या. या तिघी बहिणींनीच जागतिक ऑलिम्पियाडमध्ये चार वेळा भारताचे प्रतिनिधीत्व केले. हा आजवर न मोडलेला जागतिक विक्रम आहे.
- पत्रकाराचा हक्क : पत्रकाराला आपल्या माहितीचा उगम न सांगण्याचा हक्क आहे. यासाठी १९७२ साली कृष्णा देसाई खटल्यात न्यायालयात अतिशय गाजलेली झुंज दिली. यावर वृत्तपत्र विद्या परीक्षेत प्रश्न येतो.
- सुशीलकुमार शिंदे यांनी २० वर्षांपूर्वी केलेली प्रशंसा : सुशीलकुमार जाहीर सभेत म्हणाले की, 'प्रॅक्टिकल ( अंमलात आणणे शक्य असलेला) सोशॉलिझम सारकी स्वत:ची राजकीय विचारसरणी अर्थात थिअरी आणि स्वत:चे नीलकंठी तत्त्वज्ञान मांडणारे एकमेव पत्रकार म्हणजे नीलकंठ खाडीलकर.
- हिंदुत्व व नीलकंठी तत्त्वज्ञान : 'हिंदुत्व' या ग्रंथात अभिनव प्रकाशात 'हिंदुत्व' स्वच्छ स्पष्ट crystal clear मांडले. त्याच वेळी व्यक्तीला व समाजाला समर्थ घडविणारे 'नीलकंठी तत्त्वज्ञान' सादर केले.
- निर्भीड : एकाही पुढा-याकडून किंवा उद्योगपतीकडून कधी एक पैसाही घेतला नाही. आव्हान देऊन याप्रमाणे जाहीर केले. अर्थात लेखणी निस्पृह व तळागाळासाठी लढणारी.
विद्यार्थी : चिकीत्सक समूहमधील शालेय जीवनात आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत पहिला क्रमांक. विल्सन कॉलेजात 'दि बेस्ट स्टुंडट' प्राईझ. एक वर्ष फेलो म्हणून अर्थशास्त्र शिकविले.
-स्त्रियांचा हक्क : स्त्रियांना पुरुषांच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आपल्या तीन कन्या रोहिणी, वासंती व जयश्री यांना बुद्धिबळ शिकविताना. खेळण्याचा हक्क न्यायालयात व जागतिक संघटनेकडे (फिडे) जाऊन मिळवून दिला. तेव्हा एका प्रसिद्ध विचारवंत म्हणाले की, ही महात्मा फुले यांची आठवण व्हावी अशी कामगिरी झाली. त्यामुळेच आज भारतातील राष्ट्रीय स्पर्धेत आणि जागतिक स्पर्धातही पुरुषांबरोबर स्त्री बुद्धिबळपटू खेळत आहेत.
- गिरगाव चेस सर्कल चालवून बुद्धिबळाचा प्रसार केला.
- प्रॅक्टिकल सोशॅलिझमतर्फे अडीच लाख गिरणीकामगारांचा लढा लढवून नऊ कोटी रु. मिळवून दिले. त्याबद्दल कपर्दिकही घेतली नाही.
- 'नवाकाळ'चे २७ वर्षे संपादक - १ ऑक्टोबर दसरा १९६९ पासून १९९७ पर्यंत, 'मॅरेथॉन' मुलाखती गाजविल्या. विशेषत: गोळवलकरगुरुजींची मुलाखत, कॉ. श्रीपाद डांगे, कॉ. बी. टी. रणदिवे, शरद पवार, सत्यसाईबाबा यांच्या मुलाखती.
- 'भांडवलशाही वृत्तपत्रे हा भांडवलदारांचा जनानखाना आहे, तर 'नवाकाळ' सामान्यांचा तोफखाना केला.
- नाभिक, चर्मकार व धोबी यांचा प्रचंड मोर्चा मंत्रालयावर नेला. त्यांच्यासाठी सवलती मिळविल्या.
- सामान्यजनांसाठी अनेक लढे लढविले. 'नवाकाळ' हा आजही सामान्यजनांचा व मराठी माणसांचा एकमेव आधार आहे.
- मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष व विश्वस्त
- मुंबई मराठी पत्रकार संघ व मराठी पत्रकार परिषद या संस्था बंद पडल्या होत्या. म.टा.चे श्री. दि. वि ऊर्फ बंडोपंत गोखले यांच्यासह पत्रकार संघ व पत्रकार परिषद पुन्हा सुरु केल्या.
- अभिरुप विधानसभेचे कार्यक्रम पत्रकार संघातर्फे भागाभागात केले व मानधन इमारत निधीसाठी दिले.
- एक लाख रुपयांची मदत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाला केली. कारण मुख्यमंत्री नां. मनोहर जोशी यांनी जाहीर केलेली ५१ लाखांची देणगी ग्रंथसंग्रहालयाला मिळाली नाही.
- मराठीला उत्तेजनासाठी अडीच लाख रुपयांची देणगी खालील पारितोषिकांसाठी दिली.
 दहावी परीक्षेत एस. एस. सी मराठी प्रथम विषयात संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक गुण मिळवणारा विद्यार्थी/विद्यार्थिनी याला १० (दहा) हजार रुपयांचे नाट्यचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर पारितोषिक. आणि मराठी व्दितीय विषयात सर्वाधिक गुण मिळविणारे विद्यार्थी यांस दहा हजार रु. ची ( ५+३+३). नीलकंठ खाडीलकर पारितोषिके.

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com