राजा केळकर ( १९७८-७९ )

राजाभाऊ केळकर

इंदिराकांत केळकर म्हणजेच राजाभाऊ केळकर हे मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी विश्वस्त, माजी अध्यक्ष, सन्माननीय सदस्य आणि ज्येष्ठ पत्रकार. पत्रकार चळवळ तसेच पत्रकार संघाची पुरेपुर माहिती त्यांना होती. ते एक जाणकार पत्रकार होते.

अलिबागचे मुळ रहिवासी असलेल्या केळकरांनी १९४७ पासून पत्रकारितेला प्रारंभ केला. राष्ट्र सेवादलाच्या पहिल्या तुकडीचे ते सदस्य होते. साने गुरुजींना सुरु केलेल्या कर्तव्य वृत्तपत्रातून त्यांची पत्रकारिता सुरु झाली. दै. लोकसत्तामधून व निवृत्त झाले. त्यापूर्वी दै. प्रभात, दै.सांज कांती, दै. नवाकळ अशा वृत्तपत्रातूनही त्यांनी पत्रकारिता केली. गोपनीय बातम्या मिळवण्यात त्यांचा हातखंडा होता. १९४२ सालच्या आंदोलनात त्यांनी तुरुंगवासाही भोगला होता. कै. यशवंतराव चव्हाण. कै. वसंतराव नाईक, कै. वसंतदादा पाटील तसेच महाराष्ट्रातील अनेक राजकीय व्यक्तिसोबत त्यांचे चांगले संबंध होते. केळकर स्वभावाने लाघवी होते ते अविवाहीत होते.

१९८१ ते १९९० असे दहा वर्षे ते मुंबई मराठी पत्रकार संघाचे विश्वस्त होते. १९७८ ते १९७९ या वर्षात ते संघाचे अध्यक्ष होते.

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com