श्री. राधाकृष्ण राजाराम नार्वेकर

राधाकृष्ण राजाराम नार्वेकर
सावंतवाडी २० नोव्हेंबर १९३९
आरोंदा, ता. सावंतवाडी, जिल्हा - सिंधुदुर्ग
बी.ए. बी.एड आरोंदा आणि मुंबई
मराठा हायस्कूल येथे शिक्षक
१९६६ पासून पूर्णवेळ पत्रकार
- नवाकाळ मध्ये वार्ताहर १९६६ ते १९७६
वार्ताहर, मुख्य वार्ताहर, वृत्तसंपादक, सहायक संपादक, संपादक या अशा जबाबदारीच्या पदावर 'मुबंई सकाळ' काम. सध्या 'सकाळ' मुंबई च्या संपादक पदाची जबाबदारी
पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य :
- मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष या नात्याने पत्रकारितेशी संबंधीत विविध क्षेत्रात काम. लोणावळा येथील दि. गो. तेंडुलकर स्मृतिगृहाच्या उभारणीत मोठा सहभाग.
- विक्रोळी (मुंबई) येथील ओम विद्यालंकार शिक्षण संस्थेच्या उभारणीत सहभाग
- आरोंदा हायस्कूल ( मु. पो. आरोंदा, ता. सांवतवाडी, जि. सिंधुदुर्ग ) तांत्रिक विभागाच्या उभारणीत सहाय्य.
- महात्मा गाधी वाचन मंदिर, आरोंदा या संस्थेला मोठ्या प्रमाणावर पुस्तक सहाय्य
- मुंबई आणि मुंबई परिसरातील छोटी शहरे, तसेच गावे यांच्यावरील आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संबंधांचा अभ्यास करुन तेथील समस्या मांडणा-या विविध विशेषांकाचे संपादन, वसई, विरार, ठाणे नवी मुंबई, पालघर, शहापूर, पनवेल, भाईंदर, मुरबाड, महाड, अलिबाग या विशेषांकाचे त्या शहरातूनच प्रकाशन. या शहरातील मान्यवर व्यक्ती, संस्था वैशिष्टयपूर्ण स्थळे यांची विस्तृत माहिती या विशेषांकातून असल्यामुळे त्यांना संपात्यमूल्य लाभले आहे. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वाढत्या औद्योगिकीकरणामुळे या गावांच्या समस्या वाढल्या, प्रश्न बिकट बनले यासाठी मुंबई महानगरपालिकेने व राज्य सरकारने खास अनुदान / सहाय्य द्यावे अशी मागणी या खास अंकाद्वारे केली.
- कोकण रेल्वेचे समभाग कोकणातील रहिवाश्यांनी आणि त्यातही मुंबईकर कोकणवासियांनी घ्यावे यासाठी 'सकाळ' (मुंबई) तर्फे खास चळवळ व बैठका.
- तळमजला व्यतिरिक्त इतर मजल्यावर टपाल वितरण बंद आणि तळमजल्यावर टपाल पेटी ठेवण्याची सक्ती आशासारख्या लोकहित विरोध योजना विरुद्ध सातत्याने आवाज उठविला. तळमजल्याव्यतिरिक्त टपाल वितरण बंद योजना ' मुंबई सकाळ'मधील स्वाक्षरी, सभा, मोर्चा वगैरे मोहिमेनंतर मागे घेण्यात आली. अशा योजनाच्या विरोधात लेखना व्यतिरिक्त मोर्चा, निषेध सभा इत्यादी मार्गानेही चळवळ.
- सध्या 'मराठी वाचवा - मराठी टिकवा' या चळवळीत सक्रीय सहभाग. या चळवळीसाठी विविध सामाजिक साहित्यिक संस्था व मान्यवर व्यक्तींना एकत्र आणण्याचा प्रयत्न
- मुंबई मराठी पत्रकार संघ अध्यक्ष १९७५-७६ व विश्वस्त १९९१-९२ ते ९७-९८
- जागतिक मराठी अकादमी कार्याध्यक्ष - १९९७ पासून
- ओम विद्यालंकार शिक्षण संस्था ( विक्रोळी ) उपाध्यक्ष - १९९५ पासून
- आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई - कार्यकारिणी सदस्य - १९९४ पासून.
- आरोंदा ग्रामोन्नती मंडळ, कार्याध्यक्ष - १९९९ पासून
- शिक्षण, महिलांच्या समस्या आणि अदिवासी विकास याक्षेत्रात वैशिष्टयपूर्ण कार्य करणा-या संस्थांचा / व्यक्तिंचा दरवर्षी समारंभपूर्वक गौरव करणा-या श्रीमती सुशीला परांजपे धर्मदाय न्यायाचे अध्यक्ष - १९९७ पासून
- 'सकाळ रिलिफ फंड' द्वारे कोकणातील नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रत्यक्ष मदतकार्यात सहभाग.
- 'मराठी वृत्तपत्रांचा इतिहास' लिहिणारे व्यासंगी पत्रकार रा. के. लेले यांच्या नावाने पाठ्यवृत्ती देणा-या स्मृती समितीची स्थापना करण्यास पुढाकार. प्रारंभापासून कार्याध्यक्ष म्हणून सहभाग. विशिष्ट विषयांचा अभ्यास करु इच्छिणा-या मराठी पत्रकारांना या समितीतर्फे पाठ्यवृत्ती देण्यात येते.
- छायाचित्रकार स्व. मंदार काकडे स्मृती समिती - कार्याध्यक्ष
परदेश प्रवास :
- अमेरिका, इंग्लंड - १९८३ ( स्व. इंदिरा गाधी)
- जपान - १९९२ (नरसिंह साव)
- रशिया - १९९३ (एच.डी. देवेगौडा )
- बांगलादेश - १९९१ (अटलबिहारी वाजपेजी )
या पंतप्रधानांसोबत दौरे.

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com