श्रीमती कुसुम रानडे

सौ. कुसुम माधव रानडे

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या विद्यमान विश्वस्त. या पदावर दोनदा कार्यरत.
कुसुम रानडे यांना आवाजानेच लोक ओळखतात. आकाशवाणी, मुंबई केंद्रावरील ज्येष्ठ वृत्त निवेदिका - सहाय्यक संपादिका. आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागातून ३५ वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त.

फिल्म्स डिव्हिजन आणि महाराष्ट्र शासनाचा चित्रपट विभाग यांच्या असंख्य माहितीपटांचे लेखन आणि निवेदन. अे क्लास आर्टीस्ट, अनेक इंग्रजी लेखांची मराठी भाषांन्तरे.
पत्रकार संघात सामान्य सदस्यापासून कार्यकारिणी सदस्य, उपाध्यक्ष अशा विविध पदांवर कार्यरत.
दर्पणच्या महिला पत्रकार विशेष अंकाचे संपादन. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळातील पत्रकार म्हणून संघातर्फे सन्मानित करण्यात आलेल्या पत्रकारांत समावेश. चित्पावन ब्राह्मण संघाचा उल्लेखनीय कार्य पुरस्कार. पत्रकार संघाचा लेखक पुरस्कार.
महिला विकास मंडळ, कुलाबा या संस्थेमध्ये सक्रीय सहभाग, तिथेही चिटणीस, उपाध्यक्ष, विश्वस्त अशा विविध जबाबदा-या पार पाडल्या.
साहित्य, संगीत, नाट्य अशा विविध कलांची आवड. त्यामध्ये रस.

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com