श्री. वसंत शिंदे


मुंबई मराठी पत्रकार संघाला या वेळी पुन 'भला' अध्यक्ष मिळाला. वसंत शिंदे हा खरोखरच भला माणूस त्यामुळे विविध वयोगटातल्या सगळ्या दिग्गज पत्रकारांनी पुन: त्या्च्यावर विश्वास टाकला तेव्हा तीच गोष्ट पुन: एकदा सिद्ध झाली.
या पत्रकार संघाचं अध्यक्ष होण्याची शिंदेची ही सलग या पत्रकार चौथी वेळ एकूण 'टर्म' पाच. कृ. पां. सामक अध्यक्ष असताना १९७० साली शिंदे पत्रकार संघाचे पहिल्यांदा पदाधिकारी झाले. १९८०-८१ ला ते संघाचे अध्यक्ष म्हमून पहिल्यांदा निवडून आले. संघाला स्वत:ची जागा असावी या विचाराने त्याआधीच कामाला सुरुवात झाली होती. शिंदेमुळे त्याला गती मिळाली, आकार मिळाला.
काकासाहेब नवरे, आप्पा पेंडसे, गो. मं. लाड अशी दिग्गज मंडळी संघाची विश्वस्त असतानाच शिंदेचा संघातला वावर सुरु झाला होता. पत्रकार संघाच्या त्या वेळी असणा-या जागेची सफाई ते 'हाती धरुनी झाडू' करत असत.
शिंदे आणि संघ असं समीकरण आता झालं असतं, तरी त्यांचा पिंड राष्ट्र सेवा दल सैनिकांचाच. १९६४ साली 'साधना'तून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात झाली. सेवा दल पत्रिका, लोकमित्र, गोकुळ, लघुउद्योग, समाचार भारती असा प्रवास करत १९७१ मध्ये ते लोकसत्ता आले ते आजतागायत पत्रकार संघाच्या इमारतीचा पाया त्यांनी घातला 'कळस' ही त्यांच्याच हस्ते होणार आहे. शिंदेच्या धडपडीला मिळालेली ही सर्वात मौल्यवान मान्यता आहे.
१९७१-१९८१ वार्ताहर
१९८२ पासून - प्रमुख वार्ताहर
१९७०-७३ पत्रकार संघाचे संयुक्त कार्यवाह
८०-८१व ९०-९१, ९८-९९ अध्यक्ष
२००१ पासून विश्वस्त
लोकसत्तेत - 'पालिका दर्पण' हे सदर लोकप्रिय होते
१९८४ साली मुंबई मराठी पत्रकार संघाचा आप्पा पेंडसे स्मृती पुरस्कार
२००९ चा मुंबई मराठी पत्रकार संघाचा गा. गो. जाधव पुरस्कार
फ्रेंड ऑफ बाँबे - पुरस्कार
पत्रकार भवनाची उभारणी

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com