श्री. सुकृत खांडेकर

सुकृत खांडेकर ( कार्यकारी संपादक, दै. केसरी )
जन्म तारीख :  ११ जुलै १९५२
शिक्षण : बी. कॉम., बी. जे. - पुणे विद्यापीठ
टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून 'मास्टर ऑफ जर्नालिझम' मध्ये सर्वप्रथम येण्याचा मान सन २००८ या वर्षी मिळविला. तत्कालीन कुलपती व केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे व कुलगुरु डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते विशेष सन्मान झाला.

अडस्तीस वर्षे पत्रकारीतेत


- १९७३ - ७४ केसरी (पुणे), वार्ताहर
- १९७४ - ७५ सकाळ (पुणे), वार्ताहर
- १९७७ ते १९७८ : लोकसत्ता (मुंबई), उपसंपादक
- १९७८ ते १९८२ : महाराष्ट्र टाइम्स ( मुंबई ), उपसंपादक
- १९८२ ते १९९६ : दैनिक केसरीचे मुंबई व दिल्लीचे विशेष प्रतिनिधी
- १९९७ ते २००२ : दै. लोकसत्ताचे नवी दिल्ली येथे विशेष प्रतिनिधी
- सन २००२ ते फेब्रुवारी २००९ : महाराष्ट्र टाइम्स, मुंबई येथे वरिष्ठ सहसंपादक
- १ मार्च २००९ ते १४ जुलै २००९ : लोकमत वृत्तसमूहाचे राजकीय संपादक.
- १५ जुलै २००९ ते ३१ मे २०११ : 'लोकमत'(मुंबई) संपादक.
- १ जून २०११ पासून दै. केसरी (पुणे/मुंबई) कार्यकारी संपादक
- राज्य विधिमंडळाचे १५ वर्षे तर संसदेचे ६ वर्षे वृत्तसंकलनाचा अनुभव.
- पत्रकार म्हणून देशभर बहुतेक सर्व राज्यांचा दौरा.
- १९७५-७७ महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, मुंबई येथे सहा. जनसंपर्क अधिकारी
- लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ केसरी, नवशक्ती, सा. लोकप्रभा, सोबत स्वराज्य मनोहर, सह्याद्री आदितून ५ हजारावर लेख, वार्तापत्रे, विविध विषयांवर प्रसिद्ध.
- दिल्लीत असताना : लोकसत्तामधून 'लाल किल्यावरुन' हे वार्तापत्र - ६ वर्षे
- दै. केसरीतून 'मु्ंबईचे वार्तापत्र' १५ वर्षे
- सा. सोबतमधून 'पुणे आणि पुणेकर' - ३ वर्षे
- सा. स्वराज्यमधून  : अशी ही मुंबई - २ वर्षे
- मटामधून - दर रविवारी 'स्टेटलाईन' ( विविध राज्यातील घडामोडींवर सदर) - २ वर्षे.
- शिवाय अग्रलेख, धावते जग, राजकीय मुलाखती, विश्लेषण, विशेष लेख, विशेष बातम्या.
- लोकमत - राजकीय घडामोडींवर आधारित 'स्टेट लाइन' कॉलम ( अडिच वर्षे)
- दै. केसरीतून दर सोमवारी 'मुंबई कॉलिंग' सदर - ( जून २०११ पासून )
- दै. केसरीतून दर रविवारी 'स्टेटलाइन' सदर ( जुलै २०११ पासून )
- विश्वस्त , मुंबई मराठी पत्रकार संघ ( सन. २००४ ते २००९ )
- विश्वस्त , मुंबई मराठी पत्रकार संघ ( सन. २००९ ते २०१३ )
- माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ( १९९८-२००० )
- सदस्य, नियामक मंडळ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ
- सदस्य, लोकसभा वृत्तपत्र सल्लागार समिती ( १९९८-२००० )
- सदस्य, महाराष्ट्र राज्य प्रेस अॅक्रिडिएशन कमिटी ( १९९२ ते १९९७ )
- माजी अध्यक्ष - मंत्रालय, व विधिमंडळ वार्ताहर संघ ( १९८९, १९९०, १९९१ )
- सदस्य, महाराष्ट्र, पत्रकार कल्याण निधी.
- सदस्य, पत्रकारांवरील हल्ल्यांची दखल घेणारी राज्य सरकारची समिती

पुरस्कार

- कै. बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार ( १९९९ )
- कै. वरुणराज भिडे पत्रकारिता पुरस्कार ( २००१ )
- कै. माधवराव शिंदे पत्रकारिता पुरस्कार ( २००४ )
- महाराष्ट्र पत्रकार संघ पुरस्कार ( २००८)
- मनोहर श्री पत्रकार रत्न पुरस्कार ( २००८)

पुस्तके

- झेलमच्या तीरावरुन ( काश्मीर खो-यातील हिंसाचार ) केसरी प्रकाशन
- वसंतदादा पाटील - महारपुरुष ( संपादन सहाय्य )

आकाशवाणी- टि.व्ही.

- नवी दिल्लीत असताना आकाशवाणी केंद्रावर मराठी वृत्त निवेदक ( १९९४, १९९७ ते २००२)
- आकाशवाणी - टिव्हीवरुन अनेक कार्यक्रम भाग

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com