अभ्यासक्रम तपशील

अभ्यासक्रम
या अभ्यासक्रमांत विद्यार्थ्यांना विविध विषय शिकविले जातील. प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येतील.
अभ्यासक्रमाचे विषय पुढीलप्रमाणे :
१. पत्रकारिता : मूलतत्वे, व्यवसायाचे स्वरुप व  सद्यस्थिती
२. संपादन व वृत्तपत्रीय लेखन
३. बातमीदारी
४. इलेक्ट्रॉनिक मीडिया.
५. जनसंपर्क व जाहिरात
६. प्रकल्प अहवाल
७. प्रात्यक्षिक कार्य

विषय १
पत्रकारिता : मूलतत्त्वे, व्यवसायाचे स्वरुप व सद्यस्थिती
उद्देश : १ विद्यार्थ्यांना पत्र व्यवसायाचे ऐतिहासिक महत्त्व समजावून देणे.
२. गेल्या दीड शतकाकील वृत्तपत्रीय जगतातील घडामोंडीची विवेचनात्मक माहिती देणे.
३. महाराष्ट्र राज्यातील पत्रकारितेची वाढ आणि विकास : ग्रामीण, शहरी, साखळी वृत्तपत्रे (बहुआवृत्ती) दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, वार्षिक, दिवाळी अंक.
४. भारताची स्वातंत्र्य चळवळ आणि पत्रकारिता-तौलनिक अभ्यास / संयुक्त महाराष्ट्र आंदोलन व पत्रकारिता.
५. भारतातील वृत्तपत्रांची वाढ. विकास आणि वृत्तपत्र व्यवसायाची सद्यस्थिती

विषय २
संपादन व वृत्तपत्रीय लेखन
१. वृत्तपत्रातील मजकूर : विशेषत: बातम्यांखेरीज इतर मजकूर
२. वृत्तपत्रांतील मजकुराचे प्रकार : विश्लेषण
३. वृत्तपत्रात लेखनाची बाहेरील व्यक्तिंना संधी
४. लेखनाचे विषय - क्षेत्रे
५. लेखनाची तयारी - संदर्भ
६. लेखन शैली व सादरीकरण
७. वृत्तपत्रीय सदरे व पुरवण्या
८. अन्य माध्यमातील लेखन संधी
९. वाचकांचे पत्रे

विषय -३
१. अ) बातमीची व्याख्या : हेतू, बातमीचे महत्त्व.
   ब) वार्ताहराची जबाबदारी : वार्ताहरांचे प्रकार
२. अ) वृत्तलेखन
  ब) लेखनाची तंत्रे
३. अ) वृत्त विश्लेषण
   ब) वृत्त संकलनाची विविध क्षेत्रे व पद्धती
४. मुलाखतीचे तंत्र व लेखन
५. इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी वृत्तांकन.
६. प्रात्यक्षिके - पत्रकार परिषदांना/वार्तालापांना उपस्थिती.

विषय ४
१. रेडिओ व टेलिव्हिजन प्रसाराची मूलतत्वे.
२. वृत्तपत्र व चित्रपट आणि रेडिओ व दूरदर्शन यातील फरक
३. रेडिओ व टी. व्ही. चा प्रारंभ, वाढ आणि विकास
४) रेडिओ वृत्त : भूमिका आणि कार्यपद्धती, स्त्रोत, वृत्तमूल्ये, वृत्तव्यवस्थापन, वार्ताहराची कौशल्ये, संपादकीय कौशल्ये, रेडिओ बातमीपत्र, रेडिओ कार्यक्रम.
५. दूरदर्शन :
अ) बातम्या - भूमिका आणि कार्यपद्धती.
ब) दूरदर्शन कार्यक्रम : करमणूक माहिती व प्रसार
क) निवेदक, उद्घोषक यांची कौशल्ये.
ड) राष्ट्रीय, प्रादेशिक, आंतरराष्ट्रीय प्रसारण.
इ) उपग्रह वाहिन्या व केबल टी. व्ही. : इतर माध्यमांवरील परिणाम

इ. इंटरनेट :
उगम, विकास, कार्यपद्धती यांचा परिचय,

विषय - ५
जनसंपर्क व जाहिरात
१. जनसंपर्क आणि संपर्क व्यवस्थापन
२. जनसंपर्काची तत्त्वे. प्रसार माध्यम संपर्क.
३. जाहिरात :
कला व शास्त्र, जाहिरात लेखन, इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरातींचे लेखन-चित्रण.
४. जाहिराती आणि माध्यम व्यवसायाचे अर्थकारण

विषय ६
विद्यार्थ्याला आपल्या आवडीला विषय निवडून त्याचा सविस्तर अहवाल तयार करावा लागेल. त्याचे मूल्य़मापन परीक्षेसाठी केले जाईल.

विषय ७
प्रात्यक्षिक कार्य
या शिवाय विकास पत्रकारिता, भारताचा व महाराष्ट्राचा इतिहास यासाठी खास व्याख्याने.

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com