समस्यांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न पत्रकारितेतून झाला पाहिजे - सुमित्रा महाजन


यावेळी पत्रकार संघाच्या टपाल पाकिटाचे मुख्य अतिथींच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तत्पूर्वी चीफ पोस्ट मास्तर जनरल श्रीमती उषा चंद्रशेखर यांनी पत्रकार संघाच्या टपाल पोस्ट पाकिटाविषयी माहिती दिली व मुख्य अतिथींना पोस्ट पाकिटाचे अनावरण करण्याची विनंती केली. अमृतमहोत्सव समितीचे अध्यक्ष कुमार कदम यांनी श्रीमती उषा चंद्रशेखर यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पत्रकार संघाचे आजवरचे अध्यक्ष व विश्वस्त यांचा सत्कार करण्यात आला. कुमार कदम (माजी अध्यक्ष), भारतकुमार राऊत (माजी अध्यक्ष व माजी विश्वस्त), प्रकाश कुलकर्णी (माजी अध्यक्ष व विद्यमान विश्वस्त), अजय वैद्य (माजी अध्यक्ष व विद्यमान विश्वस्त), नरेंद्र वाबळे (माजी अध्यक्ष), प्रसाद मोकाशी (माजी अध्यक्ष), देवदास मटाले (विद्यमान अध्यक्ष), सुकृत खांडेकर (माजी विश्वस्त), श्रीमती वैजयंती कुलकर्णी-आपटे (विद्यमान विश्वस्त) यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी स्थानिक खासदार अरविंद सावंत यांनी मुख्य अतिथींचा सत्कार केला, तर खासदार अरविंद सावंत यांचा पत्रकार संघाचे अध्यक्ष देवदास मटाले यांनी सत्कार केला.

याप्रसंगी वर्धापनदिनी दिल्या जाणाNया पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मुख्य अतिथी माननीय लोकसभा अध्यक्ष श्रीमती सुमित्रा महाजन यांनी पुरस्काराच्या मानकNयांचा पुरस्कार देऊन गौरव केला. पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे- श्री. सुहास जोशी, साप्ताहिक लोकप्रभा : शोधपत्रकारितेसाठी दिला जाणारा ‘पद्मश्री यमुनाताई खाडिलकर’ पुरस्कार (शाल-श्रीफळ, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ, धनादेश रु.५,०००/-), श्री. पां. ह. जुनगरे : वृत्तपत्रात काम केलेल्या ज्येष्ठ मुद्रितशोधकास दिला जाणारा ‘कविवर्य प्रा. भालचंद्र खांडेकर’ पुरस्कार (शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ), श्री. संजीव पंढरीनाथ भागवत, दै. प्रहार : सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केल्याबद्दल दिला जाणारा ‘समतानंद अनंत हरि गद्रे’ पुरस्कार (शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ, धनादेश रु. ५,०००/-), श्री. रामचंद्र (बाळ) मुणगेकर, (ज्येष्ठ छायाचित्रकार) : वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून प्रदीर्घ कामगिरीबद्दल दिला जाणारा ‘अ‍ॅड. अधिक शिरोडकर पुरस्कृत तोलाराम कुकरेजा वृत्तछायाचित्रकार’ पुरस्कार (शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ, धनादेश रु. ५,०००/-), श्री. निशिकांत जोशी, संपादक, दै. सागर, चिपळूण : मुंबईबाहेरील ज्येष्ठ पत्रकार/संपादकास दिला जाणारा ‘युगारंभकार, सर्वोदयी कार्यकर्ते मधु रावकर स्मृती पुरस्कार (शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ, धनादेश रु. ५,०००/-). पुरस्कार विजेत्या सर्वांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार निशिकांत जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या समारंभात वयाची पासष्ट वर्षे पूर्ण केलेले पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सदस्यांना मुख्य अतिथींच्या हस्ते सन्माननीय सदस्यत्व प्रदान करण्यात आले. त्यात दिनकर रायकर, नीला उपाध्ये, नागेश केसरी, सुरेश बिलये यांचा समावेश होता. तसेच भारत सरकारतर्पेâ पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले प्रसिद्ध छायाचित्रकार सुधारक ओलवे यांनाही सन्माननीय सदस्यत्व बहाल करण्यात आले. गौरवमूर्तींच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर व पद्मश्री सुधारक ओलवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन कार्यवाह प्रमोद तेंडुलकर यांनी केले.
   

कार्यक्रम वृत्तात  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com