मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे यंदाचा आचार्य अत्रे पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार, आयबीएन लोकमतचे संपादक श्री.निखील वागळे यांना...

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे यंदाचा आचार्य अत्रे पुरस्कार  ज्येष्ठ पत्रकार, आयबीएन लोकमतचे संपादक श्री.निखील वागळे  यांना महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री.आर.आर. पाटील यांच्या हस्ते सोमवार १३ ऑगस्ट २०१२ रोजी सायं.  ०५.३० वा.  प्रदान करण्यात येत आहे.   मुंबई मराठी पत्रकार संघाच्या नव्या संकेतस्थळाचा (website) शुभारंभ यावेळी करण्यात येणार आहे, तसेच या समारंभात पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे दिनकर साक्रीकर व मनोहर देवधर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार असून सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कारही होईल. पत्रकार भवनात होणा-या या समारंभाला  उपस्थित राहावे हि विनंती.

   

कार्यक्रम वृत्तात  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com