कुमार कदम यांना वरुणराज भिडे पुरस्कार

पत्रकार वरुणराज भिडे यांच्या स्मृत्यर्थ पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात येणारा मुख्य पुरस्कार यंदा महाराष्ट्र वृत्तसेवा संस्थेचे संस्थापक-संपादक कुमार कदम (मुंबई) यांना जाहीर झाला आहे. तर, आश्वासक पत्रकारिता पुरस्कार दै. लोकसत्ताचे अभिजित घोरपडे (पुणे), दै. लोकमतचे विश्वास पाटील (कोल्हापूर), आयबीएम लोकमच्या सौ. सुवर्णा दुसाने-जगदाळे (मुंबई) यांना जाहीर झाला आहे. पत्रकार वरुणराज भिडे मित्र मंडळ ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त प्रा. विलास जोशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कुमार कदम हे गेली अकरा वर्षे दैनिक महाराष्ट्र टाइम्समध्ये 'मराठी मुलखात कोकण' हे सदर लिहित असून त्यांनी गेली ४० वर्षे विविध वृत्तपत्रांतून लेखन व संपादन केले आहे. 'ज्ञान मंदिरातील लाचखाऊंना आवरा' 'मुंबईचा मुसाफीर' आदी स्तंभलेखनातील त्यांचे लेखन गाजले. स्मृतिचिन्ह, २१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. कुमार कदम हे मुंबई मराठी पत्रकार संघाचे तसेच राज्य वृत्तपत्र अधिस्वीकृती समितीचे माजी अध्यक्ष आहेत.

या पुरस्कारांबरोबरच पत्रकारिता परीक्षेत यश संपादन करणा-या राजेंद्र भोईवार, वेदांत चंद्रात्रे यांचाही गैरव करण्यात येणार आहे. 'लोकसत्ता'चे मुख्य संपादक गिरीष कुबेर यांच्या हस्ते २८ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता पुणे येथे एस. एम. जोशी सभागृहात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील अध्यक्षस्थानी असतील. असेही जोशी यांनी नमूद केले.

ज्येष्ठ पत्रकार एस. के. कुलकर्णी, देवदास मटाले, दशरथ पारेकर यांच्या निवड समितीने पुरस्कार्थीची निवड केली आहे.

   

कार्यक्रम वृत्तात  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com