श्री. कुमार देवराम कदम


१४ बी, मॅरॅथॉन, लाला देवीदयाळ रोड, तुळशीराम बागेच्या मागे, मुलुंड (पश्चिम), मुंबई -८०

प्राथमिक शिक्षण :
- पोयबावडी महापालिका प्राथमिक शाळा, बालमोहन विद्यामंदिर, दादर, एलफिन्स्टन टेक्निकल हायस्कूल, धोबीतलाव, मुंबई
- महाविद्यालयीन शिक्षण : सर एस. एस. पाटकर कॉलेज ( प्रथम वर्ष विज्ञान )
- डिप्लोमा इन प्रिटींग टेक्नॉलॉजी ( गव्हर्नमेंट इन्सिटट्यूट ऑफ प्रिटींग टेक्नॉलॉजी, मुंबई)
- डिप्लोमा इन ट्रेड युनियॅनिझम अॅन्ड इंडस्ट्रियल रिलेशन्स ( महाराष्ट्र स्टेट इन्सिटट्यूट ऑफ लेबर स्टडिज, मुंबई )

वृत्तपत्र क्षेत्रातील अनुभव : एकूण ३४ वर्षे

- विद्यार्थी देशत असतानाच ( जून १९७१) 'रविवारच्या लोकसत्ता मध्ये' ज्ञान मंदिरातील लाचखाऊंना आवरा' या शिर्षकाखाली लेख लिहून शाळांतून
  प्रवेशासाठी घेण्यात येणा-या सक्तीच्या देण्ग्यांच्या विरोधात सर्वप्रथम आवाज उठविला.
- त्याच वर्षी 'साप्ताहिक सुयश' मध्ये 'मुंबईचा मुसाफीर' या टोपण नावाने 'यह मुंबई मेरी जान' या सदराचे लिखाण सुरु करुन वृत्तपत्र सृष्टीत प्रवेश
- रत्नागिरी येथून प्रसिद्ध होणा-या 'दैनिक रत्नभूमि'चा मुंबईतील वार्ताहार म्हणून पूर्णवेळ पत्रकारितेला प्रारंभ ( १९७२), सुमारे पाच वर्षे काम केले.
- याच काळात 'साप्ताहिक मार्मिक' मधून 'महापालिकेमध्ये एक नजर' हे सदर चालविले
- आणिबाणीनंतर 'हिन्दुस्थान समाचार' या भाषिक वृत्तसंस्थेत १२ वर्षे वार्ताहर म्हणून काम केले.
- महाराष्ट्र वृत्त सेवा (महावृत्त) या संस्थेची १९९१ साली स्थापना केली व त्या संस्थेचे मुख्य संपादक या नात्याने आजही काम पहात ाहे.
- दैनिक पुढारी ( कोल्हापूर ) आणि दैनिक तरुण भारत ( बेळगाव ) यांचा विशेष प्रतिनिधी म्हणून मुंबईत बरीच वर्षे काम पाहिले.
- जुलै २००१ पासून 'दैनिक महाराष्ट्र टाइम्स'साठी 'मराठी मुलखात कोकण' या सदराचे लिखाण व कोकण संबंधित वृत्त संकलन
पत्रकार संघटनांतील : मुंबई मराठी पत्रकार संघ - संयुक्त कार्यवाह ( १९७८-७९), कार्यवाह ( १९७९-८०,८०-८१) अध्यक्ष ( १९८२-८३) आणि २००३ ते २००९
मराठी पत्रकार परिषद-सरचिटणीस (१९८१-८३), कार्याध्यक्ष ( १९८३-८५), अध्यक्ष ( १९८५-८७) व (१९८९-९१)
महाराष्ट्र पत्र प्रबोधिनी, नाशिक-व्यवस्थापकीय विश्वस्त
शासकीय समिती : वृत्तपत्र अधिस्वीकृती समिति ( पत्रकारांना शासन मान्यता देणारी समिती ) : सदस्य ( १९८७-९१) अध्यक्ष ( १९९२-९६)
विद्यमान सदस्य - माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत स्थापन केलेली राज्यस्तरीय नियमन समिती
विद्यार्थी चळवळीतील सहभाग

- भारतीय विद्यार्थी सेना - संस्थापक-संघटक, १९७०-७१ साली शाळांतून प्रवेशासाठी घेण्यात येणा-या देणग्या तसेच पालकांच्या मुलाखतींच्या विरोधात सर्वप्रथम आंदोलन छेडले. ११ वी (मॅट्रीक)च्या फॉर्मची (प्री लीम) परिक्षा रद्द करावी या मागणीसाठीच्या यशस्वी आंदोलनाचे आयोजन, यात दरम्यान काही काळ भारतीय कामगार सेनेत काम केले.
सामाजिक क्षेत्रातील : अध्यक्ष, ऑर्गनायझेशन फॉर प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरोन्मेंट अॅन्ड नेचर (ओपन) उपाध्यक्ष : पुष्पा अॅकॅडमी फॉर न्युट्रीशन अॅन्ड हेल्थ अवरनेस
विशेष उल्लेखनीय बाबी : सीमा लढा-कर्नाटकातील मराठी भाग महाराष्ट्राला जोडावा या मागणीसाठी गेली ४५ वर्षे सुरु असलेल्या लढ्याला पाठींबा देण्यासाठी साथी एस.एस.जोशी यांच्या नेत्तृत्वाखाली स्थापन झालेल्या सर्व पक्षीय संयुक्त महाराष्ट्र सीमा समितीचा चिटणीस म्हणून प्रारंभापासून गेली २५ वर्षे कार्यरत आहे. सीमा लढ्याट अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. 'बॉम्बेचे 'मुंबई' करण्यासाठी आंदोलन सुरु करण्यात पुढाकार घेतला.

पोलीस आंदोलन - १९८१ साली महाराष्ट्रातील पोलीस कर्मचा-यांनी अंतुले सरकारच्या परवानगीने स्वत:ची संघटना बांधली. या संघटनेच्या वतीने १९८२ मध्ये विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. तत्कालीन भोसले सरकारने या आंदोलनाला 'पोलीसांचे बंड' असे नाव देऊन सुमारे ९०० पोलीस शिपायांना सेवेतून बडतर्फ केले होते. या प्रकरणी वृत्तपत्रातून सातत्याने लिखाण करुन तसेच न्यायालयात जाऊन पोलिसांचे बंड झाले नव्हते हे सिद्ध करुन दाखविण्यात तसेच सर्व बडतर्फ शिपायांना पुन्हा कामावर घेण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. यासाठीची न्यायालयीन लढाई तब्बल २२ वर्षे इतकी प्रदीर्घ काळ आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत चालली. त्यामुळे देशोधडीला लागणारे ९०० संसार वाचविण्याचे समाधान मिळाले.

   

पत्रकार संघ अध्यक्ष परंपरा  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com