नियमावली

मुंबई मराठी पत्रकार संघाचे दी. गो. तेंडुलकर स्मृतिमंदिर (लोणावळे) वापराबाबतची नियमावली

१. मोठ्या खोलीचा वापर चार व्यक्तींसाठी तर लहान खोली ही दोन व्यक्तींसाठी आहे.
२. खोलीत त्यापेक्षा अधिक व्यक्ती राहिल्यास सदस्यांना प्रत्येक व्यक्तीमागे प्रतिदिन रु. १००/- जादा भरावे लागतील. हाच दर सदस्येतरांसाठी रु. १५०/- असा आहे.
३. मोठ्या खोलीत कमाल दोन व लहान खोलीत कमाल एक या मार्यादेतच जादा व्यक्तींची सोय हेऊ शकते.
४. खोलीच्या वापराचे आरक्षण करताना आरक्षित दिवसांचे संपूर्ण सेवाशुल्क व अनामत रक्कम आगाऊ भरावी लागते. अनामतीचा परतावा पत्रकार संघाच्या मुंबई कार्यालयातच केला जातो याची नोंद घ्यावी.
५. सदस्येतरांच्या आरक्षणासाठी 'मुंबई मराठी पत्रकार संघा'च्या एका सदस्याची शिफारस असणे अनिवार्य आहे.
६. सकाळी १० ते दुस-या दिवशी सकाळी १० असा एक दिवस समजला जाईल. या वेळेनंतरचा दिवसाचा कोणताही भाग एक दिवस गणला जाईल. रात्री ११ वाजल्यानंतर आरक्षणकर्त्यांला खोलीत प्रवेश मिळणार नाही.
७. कार्यशाळा, शिबिरे वा तत्सम कार्यक्रमासाठी सभागृह वापरायचे असल्यास त्यासाठी प्रतिदिन रु. १,५००-/ असे सेवाशुल्क ाहे.
८. स्वयंपाकघरातील गॅस व भांड्यांच्या वापरासाठी प्रतिदिन प्रत्येक खोलीमागे वेगळे सेवाशुलक आकारण्यात येते.
९. बिछाने, चादरी खराब झाल्यास व अपघाती जाळल्या गेल्यास तसेच कप-बशा किंवा अन्य वस्तू फुटल्यास मोडतोड झाल्यास व हरवल्यास संबंधितांना त्यांची भरपाई करावयाची आहे. भरपाईची रक्कम अनामत रकमेतून वळती करण्यात येईल. नुकासन अनामत रक्कमेपेक्षा जास्त असेल तर ती खोली सोडल्यापासून सात दिवसात अर्जदारांनी नुकसानीची रक्कम भरुन देणे आवश्यक आहे.

   

लोणावळा विश्रामगृह  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com