न. र. फाटक (१९४१-४२)

कै. प्रा. नरहर रघुनाथ फाटक
जन्म : १५ एप्रिल १८९३ जांभळी ( भोर संस्थान )
शिक्षण - १९१७ बी. ए. ( अलाहाबाद विद्यापीठ ) विषय - तत्त्वज्ञान

व्यावसायिक कारकीर्द
१९१७-१९३५ - पत्रकारिता
१९१८ पासून - विविध ज्ञान विस्तार
१९१८-१९२४ - इंदू प्रकाश ( सहसंपादक)
१९२३-१९३५ - ज्ञानप्रकाश, नवाकाळ (उपसंपादक) विविध वृत्त नवी वाट (संपादक),
प्रकाश साप्ताहिक स्तंभ लेखन, अग्रलेख, स्फुटे व समीक्षण
( अंतर्भेदी, फरिश्ता, मराठा, सत्यान्वेषी व आलमगीर ह्या टोपण नावानी लेखन )

अध्यापन (प्राध्यापक) :
१९३५-१९३७ - ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ
१९३७-१९५७ - राम नारायण रुईया महाविद्यालय.

अध्यक्षपद व पुरस्कार :
१९३७ - विदर्भ साहित्य संमेलन ( अमरावती )
१९४१ - मराठी पत्रकार परिषद ( पुणे)
१९४१ - मुंबई मराठी पत्रकार संघ ( संस्थापक-अध्यक्ष)
१९४७ - महाराष्ट्र साहित्य संमेलन ( हैद्राबाद )
१९६३ - महाराष्ट्र ग्रंथालय परिषद ( गोवा )
१९५८ - भारतीय स्वातंत्र्य संग्राम इतिहास समितीवर चिटणीस म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे नेमणूक
१९७० - "आदर्श भारत सेवक" या ग्रंथास साहित्य अकादमी पारितोषिक.

प्रवास :
१९५२ - चीन
१९५४ - जर्मनी, रशिया व झेकोस्लोव्हाकिया
मृत्यू - २१ डिसेंबर १९७९ मुंबई वयाच्या ८६ व्या वर्षी.

ग्रंथसंपदा
१९२४ - न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे - चरित्र व्दि. आ. १९६६
१९२८ - गद्य मुक्ताहार अथवा मराठी गद्य वाड्मयातील निवडक वेचे.
(संपादक : प्रा. व. ना नाईक यांचेसह )
१९४४ - नारायणराव पेशवे यांचा खून की आत्महत्या - टीकात्मक
१९४७ - अध्यक्षीय भाषण- महाराष्ट्र साहित्य संमेलन ३१ वे हैद्राबाद
१९४७ - ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी - व्दि. आ. १९४९
१९४८ - वरसईकर गोडसे यांचा "माझा प्रवास" - संपादन
१९४९ - भारतीय राष्ट्रवादाचा विकास
१९५० - मराठेशाहीचा अभ्यास
१९५० - श्री. एकनाथ वाड्मय आणि कार्य - व्दि. आ. १९६३
१९५१ - अर्वाचीन महाराष्ट्रातील सहा थोर पुरुष. व्दि. आ. १९५४, तृ. आ. १९६७.
१९५१ - श्री समर्थ चरित्र
१९५२ - श्री. ज्ञानेश्वर - वाड्मय आणि कार्य
१९५३ - श्री. रामदास - वाड्मय आणि कार्य व्दि. आ. १९७०
१९५५ - रशियाचे संक्षिप्त दर्शन
१९५८ - अठराशे सत्तावनची शिपाई गर्दी
१८५९ - श्री. ज्ञानेश्वरी - व्दितीय आवृत्ती ( संपादन )
१९६१ - घाशीराम कोतवाल - संपादन
१९६१ - पानिपतचा संग्राम भाग १ - संपादन सेतुमाधवराव पगडी यांचेसह. मुंबईचे वर्णन - संपादन
१९६४ - मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष - न्या. रानडे यांच्या इंग्रजी ग्रंथाचा अनुवाद
१९६४ - महाराष्ट्र राज्य ग्रंथालय परिषद, अधि. १५ वे जांबावली-अध्यक्षीय भाषण
१९६६ - सार्थ श्री. दासबोध
१९६६ - सोर्स मटेरिअल फॉर ए हिस्टरी ऑफ दि फ्रिडम मूव्हमेंट इंडिया
- खंड महात्मा गांधी, विभाग १- १९१५ - १९२२ संपादन
१९६७ - आदर्श भारतसेवक गोपाळ कृष्ण गोखले यांचे चरित्र
१९६७ - श्री मन्महाभारताचे मराठी सुरस भाषांतर - खंड १ ते ९
१९६७ - श्री मन्महाराज यशवंतराव होळकर यांचे चरित्र
१९७१ - स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोश : महाराष्ट्र राज्य विदर्भ विभाग खंड १ ला
१९७२ - लोकमान्य - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे चरित्र
१९७२ - श्री समर्थ चरित्र वाड्मय आणि संप्रदाय
१९७३ - नाट्यचार्य कृ. प्र. खाडिलकर
१९८१ - मुंबई नगरी ( मृत्युनंतर प्रकाशित )

   

पत्रकार संघ अध्यक्ष परंपरा  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com