पत्रकारिता प्रमाणापत्र, छायाचित्रण आणि वेब जर्नालिझम अभ्यासक्रम

पत्रकारिता प्रमाणापत्र, छायाचित्रण आणि
वेब जर्नालिझम अभ्यासक्रम

पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रम
------------------------------------------------
अभ्यासक्रम कालावधी : सहा महिने, अभ्यासवर्ग आठवडयातून दोन दिवस -
वेळ : सायंकाळी ६ ते ८.
अभ्यासक्रमाची उद्दिष्टे : पत्रकारितेची तोंडओळख करून घेण्यासाठी आणि लेखनाची मुलभूत कौशल्ये विकसित करण्यासाठी करायलाच हवा असा अभ्यासक्रम. पत्रकारितेतील मान्यवरांचे मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिकांवर भर.
शिक्षणाचे माध्यम : मराठी
शुल्क : अभ्यासक्रम शुल्क - रू. ८,०००-, प्रवेश शुल्क रू. २००/-, प्रवेश अर्ज रू. १००/-

प्रशिक्षण सहल व इतर प्रवासानिमित्त वेळोवेळी होणारा खर्च विद्यार्थ्यांना करावा लागेल. विदयार्थ्यांना नोट्स व इतर शैक्षणिक कागदकात्रांच्या झेरॉक्स प्रती सवलीच्या दरात उपलब्ध होऊ शकतील.
प्रवेश पात्रेतेचे नियम : किमान बारावी उत्तीर्ण.

ओळखपत्र : प्रवेश घेताना ओळखपत्रांसाठी दोन छायाचित्रे द्यावीत. प्रत्येक विद्यार्थ्याने पत्रकार संघाच्या आवारात प्रवेश करताना ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे.
अभ्यासक्रमाची संक्षिकत माहिती :
विषय-१ : पत्रकारिता - मुलतत्वे, अनुवाद, फुड जर्नालिझम, कोर्ट पत्रकारिता, गुन्हे वार्तांकन, विविध लेख, फिचर्स लेखन, जाहिरात क्षेत्रांची तोंड ओळख.
विषय-२ : रेडिओ आणि टी. व्ही. : दोन्ही माध्यमांसाठी लेखन, वृत्तलेखनाची सुत्रे, प्रभावी सादरीकरणाच्या टिकस, निर्मितीपूर्व, पश्चात ते प्रक्षेपणापर्यंतचा तांत्रिक प्रवास
विषय-३ : संपादन व ताज्या घडामोडी : वृत्तसंपादनाची कौशल्ये, ताज्या घडामोडींचे विश्लेषण

डप्लोमा इन वेब जर्नालिझम
---------------------------------------------
अभ्यासक्रमाचा कालावधी : एक वर्ष, अभ्यासवर्ग आठवडयातून एक दिवस : सायंकाळी ६ ते ८
अभ्यासक्रमाची उद्दिष्टे : वर्तमानकात्रांच्या इ-आवृत्त्या (इ-पेपर) आणि विविध न्युज वेबसाईट्स येथे नोकरीची संधी मिळण्यासाठी उपयुक्त ठरणारा अभ्यासक्रम. इंटरनेट अर्थात वेब जर्नालिझमसाठी आवश्यक तंत्रज्ञान, लेखनशैली, वेबसाईट बजेट, फोटो आणि व्हिडीओ एडीटींगचे मार्गदर्शन. ७० प्रात्यक्षिक आणि ३० थीअरी. वर्तमानकात्रांच्या वेबसाईटवर काम करण्याची संधी तसेच मुंबई मराठी वेबसाईट अपडेट संघाची करण्याची संधी.
शुल्क : अभ्यासक्रम शुल्क : रू. १०,०००/-, प्रवेश शुल्क रू. २००/- प्रवेश अर्ज रू. १००/-
प्रवेश पात्रेतेचे नियम : किमान बारावी उत्तीर्ण, इन्टरनेटचे मुलभूत ज्ञान, आठवडयातून किमान ६ ते ८ तास प्रात्यक्षिकांसाठी देणे गरजेचे, वेब जर्नालिझममध्ये पुर्णवेळ करीयर करू
इच्छीणा-या विद्यार्थ्यांना प्राधान्य
अभ्यासक्रमाची संक्षिकत माहिती : वेब जर्नालिझमची तोंडओळख : वेब जर्नालिझमचा इतिहास, मराठी वृत्तकात्रांच्या वेब आवृत्त्या ई पेपर, वेबसाईटची रचना / डिझाईन, वेबसाईट बजेट.
सामान्य ज्ञान, ताज्या घडामोडी : संगणक चालवण्याचे सामान्य ज्ञान, इंटरनेटची माहिती, संगणकावर मराठी भाषेत लेखन, फॉन्ट आणि त्यांचे रुपांतरण, फोटो एडिटींग, व्हिडिओ एडिटींग, वेगाने बातम्या लिहिण्याचे व अकाडेट करण्याचे कौशल्य.
वृत्तलेखन : वृत्तलिखाणाची भाषाशैली, जलदगतीने वृत्तलेखन, भाषांतर, बातम्यांची निवड, हेडिंग आणि इन्ट्रो लेखन.
सायबर लॉ आणि क्राईम, सोशल नेटवगिचा वाकार मोबाईल आवृत्त्या, ब्लॉग लिखाण
वाचकांचा प्रतिसाद

छायाचित्रण प्रमाणपत्र अभ्यासक्रम
--------------------------------------------------
अभ्यासक्रम कालावधी : सहा महिने, आठवडयातून दोन दिवस -
वेळ : सायंकाळी ६ ते ८
अभ्यासक्रमाची उेद्दष्टे : छायाचित्रणाची तोंडओळख करून घेण्यासाठी आणि छायाचित्रणाची मुलभूत कौशल्ये विकसित करण्यासाठी करायलाच हवा असा अभ्यासक्रम. या क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिकांवर भर.
शिक्षणाचे माध्यम : मराठी
शुल्क : अभ्यासक्रम शुल्क - रू. ८०००/- प्रवेश शुल्क रू. २००/-, का्रवेश अर्ज रू. १००/-
प्रवेश पात्रेतेचे नियम : दहावी उत्तीर्ण

प्रशिक्षण सहल व इतर प्रवासानिमित्त वेळोवेळी होणारा खर्च विद्यार्थ्यांना करावा लागेल. विदयार्थ्यांना नोट्स व इतर शैक्षणिक कागदकात्रांच्या झेरॉक्स प्रती सवलतीच्या दरात उपलब्ध होऊ शकतील.
ओळखपत्र : प्रवेश घेताना ओळखकापत्रांसाठी दोन छायाचित्रे द्यावीत. प्रत्येक विद्यार्थ्याने कात्रकार संघाच्या आवारात प्रवेश करताना ओळखकात्र दाखवणे आवश्यक आहे.
अभ्यासक्रमाची संक्षिकत माहिती :

कॅमेरा व त्याचे कार्य, त्याच्या विविध विभागांची माहिती, लेन्स, लेन्सचे कार्य, विविध प्रकार त्यांचे उपयोग, कंपोझिशन, आय. एस. ओ, फिल्टर्स, एक्सेसरीज आणि त्याचे कार्य, प्रसारमाध्यमांसाठी छायाचित्रण (फोटो जर्नालिझम), प्रासंगिक छायाचित्रे - सभा, संमेलने, व्याख्याने, सोहळे इत्यादींचे, अनकोक्षित व अकाघाती छायाचित्रे, छायाचित्रकाराला बातमीचा वास लागणे, फोटो फीचर, छायाचित्रकाराच्या अंगी असणारी आवश्यक कौशल्ये, तंत्रे, त्याचा जनसंपर्क, आऊटडोअर फोटोग्राफी - निसर्गचित्रण, मॉडेलिंग, स्पोर्टस्, प्रासंगिक छायाचित्रण - लग्न समारंभ, वाढदिवस, सभा, तत्सम प्रसंगांचे छायाचित्रण, डिजीटल फोटोग्राफी, कमर्शियल फोटोग्राफी, स्टुडिओ मॉडेलिंग, टेबलटॉप, चलतचित्रण कॅमेरा - तयार झालेल्या फोटोवर प्रक्रियेदरम्यान निर्माण झालेले दोष रंगांच्या सहाय्याने शक्य असल्यास नष्ट करणे इत्यादी व याहुनही अधिक प्रशिक्षण.

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com