पत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण

मराठी पत्रकारिता पदविका व जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रम
अभ्यासक्रमाचा कालावधी : एक वर्ष
आठवड्यातून दोन दिवस : सायंकाळी ६ ते ८

अभ्यासक्रमाची उद्दिष्टे :
१. वृत्तपत्रे, साप्ताहिके, सायदैनिके, अन्य प्रसारमाध्यमे या क्षेत्रातील पत्राकारितेची माहिती देणे.
२. प्रात्यक्षिके, सिद्धांत आणि संशोधन पद्धतीचे शास्त्र शिकविणे.
३. व्यक्तिमत्त्व, समृद्ध होण्यासाठी जनजीवन, सार्वजनिक संस्थांचे कार्य, कायदा, समाजशास्त्र, भाषा शास्त्र, इतिहास यांचे ज्ञान देणे.
४. विद्यार्थ्यांना प्रसार माध्यमातील आधुनिक तंत्रज्ञानाचा परिचय करुन देणे.

प्रवेशाचे नियम
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी. ( १२ वी उत्तीर्णांना जागेच्या उपलब्धेनुसार प्रवेश)
जागा (प्रवेश मर्यादा ) ५०
शिक्षणांचे माध्यम : मराठी
अभ्यासक्रम शुल्क : ६,०००/- रुपये
प्रवेश अर्ज व माहितीपत्रक : १००/- रुपये
प्रवेश शुल्क : २००/- रुपये
शिक्षण शुल्कात (वार्षिक), ओळखपत्र, सत्र परीक्षा व चाचणी परीक्षा, विद्यार्थी निधी, ग्रंथालय शुल्क, स्टेशनरी खर्च, अभ्यास भेटी व परीक्षा शुल्क यांचा समावेश आहे.
प्रशिक्षण सहल व इतर प्रवासानिमित्त वेळोवेळी होणारा खर्च विद्यार्थ्यांना करावा लागेल.
विद्यार्थ्यांना नोट्स व इतर शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती सवलतीच्या दरात उपलब्ध होऊ शकतील.

प्रवेश पात्रतेचे नियम :
१. पदवीधर व पत्रकारितेतील कामाचा अनुभव असणा-यांना प्राधान्य
२. आवश्यकता भासल्यास मुलाखत किंवा चाचणी घेतली जाईल.
३. शैक्षणिक गुणवत्ता व अनुभव यांच्या आधारे प्रवेश दिला जाईल.
(प्रवेश प्रक्रिया आणि प्रवेश याबाबत मुंबई मराठी पत्रकार संघाचा निर्णय अंतिम राहील.)

परीक्षा पद्धती :
वार्षिक परीक्षा, वर्षभरातील प्रात्यक्षिके, प्रकल्प अहवाल, साप्ताहिक / मासिक चाचण्या व तोंडी परीक्षा यांच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रथम वर्ग, दि्वतीय वर्ग व उत्तीर्ण या श्रेणी दिल्या जातील.

शिष्यवृत्ती आणि सन्मान :
१. पत्रकार संघ अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांला मुबंई मराठी पत्रकार संघातर्फे दिनकर साक्रीकर पुरस्कार देण्यात येईल.

विशेष व्याख्याने :
विद्यार्थ्यांना विविध विषयांचे ज्ञान व माहिती देण्यासाठी नामवंत पत्रकार, लेखक, साहित्यिक, संपादक, राजकीय नेते, प्रसिद्ध व्यक्ती यांची व्याख्याने आयोजित केली जातील. तसेच पत्रकार संघात होणा-या विविध वार्तालापांना उपस्थित राहण्याची संधी दिली जाईल.

ओळखपत्र :
प्रवेश घेताना ओळखपत्रासाठी दोन छायाचित्रे द्यावीत. प्रत्येक विद्यार्थ्यांने पत्रकार संघाच्या आवारात असताना ओळखपत्र जवळ ठेवणे अनिवार्य आहे.

ग्रंथालय :
अ : विद्यार्थ्यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचे ग्रंथालय अनामत रक्कम भरुन वापरता येईल.
ब : विद्यार्थ्यांसाठी दैनंदिन वृत्तपत्रे, सायंदैनिके आणि वार्षिक दिवाळी अंक उपलब्ध करुन दिले जातील.

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com