कुटुंबियांची पाने

हे सदर पत्रकार संघाच्या सदस्यांच्या कुटुंबियांचे आहे. ‘सदस्यांच्या कुटुंबातील सदस्य’ हा घटक संस्थेला महत्त्वाचा वाटतो. वर्षातून एक दोनदा कधी वर्षा सहलीत किंवा कोजागिरी वा होळी पौर्णिमेस पत्रकार संघात जे संमेलन आयोजित केले जाते त्यात एकत्र येण्याची आणि एकमेकांना भेटण्याची संधी मिळते. पण एरवी कामाच्या रगाड्यात दिवस आणि महिने कधी मागे पडले हे कळतही नाही. आपल्या बरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्याचा मुलगा वा मुलगी कधीतरी बोबडं बोलण्याच्या वयात किंवा शाळकरी असताना पाहिलेली असते आणि नंतर पीएच.डी. करून तो किंवा ती परदेशात कधी गेली याची बातमी, साऱ्या जगाच्या बातम्या गोळा करण्यासाठी आयुष्य वेचणारांना कधी कळतही नाही. “आमची सौ खूप छान लिहीते” असं क्वचित गप्पांमध्ये म्हणायचं,  पण संकोचामुळे ते लिखाण छपाईसाठी पाठवण्याचं टाळायचं असं नेहमी घडतं. वृत्तपत्राची पानं हातात असतात, पण हलवायानं आपली मिठाई चाखून पाहू नये असच हे काही तरी.

त्यासाठीच हे सदर खास सदस्यांच्या कुटुंबियांसाठी आहे. त्यात कोण काय लिहीलं? कविता, आपल्या कथा, मुलांचे सुंदर निबंध, कशाला मुलांना नातवंडांनी काढलेली सुबक छान चित्रं सुद्धा ह्या सदरात येतील. यात मुलांचं किंवा कुटुंबियाचं नाव तर असेलच पण कोणत्या सदस्याच्या कुटुंबातला तो किंवा ती आहे याचाही उल्लेख असेल. अशा साहित्याखाली लगेचच कोणालाही त्यांचं कौतुक किंवा अभिनंदन करण्यासाठी एक फॉर्म असणार आहे.

कुटुंबियांनी आपलं साहित्य This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. ह्या ईमेल पत्त्यावर पाठवावं. सोबत चित्र किंवा फोटो असेल तर तोही ईमेल करावा. धन्यवाद.

   

संस्थेची अध्यक्ष परंपरा  

 • 001.jpg
 • 00001.jpg
 • 002.jpg
 • 003.jpg
 • 004.jpg
 • 005.jpg
 • 006.jpg
 • 007.jpg
 • 008.jpg
 • 009.jpg
 • 010.jpg
 • 011.jpg
 • 012.jpg
 • 013.jpg
 • 014.jpg
 • 015.jpg
 • 016.jpg
 • 017.jpg
 • 018.jpg
 • 019.jpg
 • 020.jpg
 • 021.jpg
 • 022.jpg
 • 023.jpg
 • 024.jpg
 • 025.jpg
 • 026.jpg
 • 027.jpg
 • 028.jpg
 • 029.jpg
 • 030.jpg
 • 031.jpg
 • 032.jpg
 • 033.jpg
 • 034.jpg
 • 035.jpg
 • 036.jpg
 • 037.jpg
 • 038.jpg
 • 039.jpg
 • 040.jpg
   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com