हिन्दी पत्रकारितेतील योगदान

हिन्दी पत्रकारितेचा इतिहास पाहिला तर त्यात काही मराठी नावे प्रमुखपदी आढळतात. हिन्दी पत्रकारितेला १९७६-७७ या वर्षी १५० वर्षे झाली. हिन्दी प्रदेशात राहणार्‍या अनेक मराठी तरुणांचे योगदान त्याला लाभले आहे. आजही अनेक मराठी भाषिक हिन्दी वृत्तपत्रांच्या सेवेत आढळतात. बाबुराव पराडकर हे त्यापैकीच एक नाव आहे. हिन्दीतील एक अग्रगण्य पत्रकार म्हणून कै. बाबुराव पराडकर यांची इतिहासात नोंद करावी लागेल. कारण हिन्दी पत्रकारितेची एक मोठी परंपरा त्यांनी घालून दिली. त्याची नोंद मुंबई मराठी पत्रकार संघाने घेतली. मुंबई मराठी पत्रकार संघाने कै. बाबुराव पराडकर यांचे नातू श्री. पराडकर यांनी पत्रकार संघाला भेटही दिली आहे. कै. बाबुरावांच्या आधी थत्ते नावाच्या गृहस्थानी बनारसहून 'अखबार' नावाचे वृत्तपत्र काढले होते. हिन्दी पत्रकारितेच्या जुन्या जमान्यातील काही नावे अशी खाडिलकर, लक्ष्मी नारायण गर्दे, माधवराव सप्रे, अनंत गोपाळ शेवडे, वगैरे. सप्रे तर असे म्हणत असत की, 'मला माझ्या आईकडून (मराठी) काही मिळाले नाही परंतु मावशीकडून (हिन्दी) बरेच मिळाले. हिन्दी पत्रकारितेतील मराठी योगदानाचा विषय घेऊन ज्येष्ठ पत्रकार डॉ. राम मनोहर त्रिपाठी यांची कन्या मंजू पांडे हिने प्रबंध लिहिला असून त्यावर डॉक्टरेट मिळविली आहे. यावरूनही विषयाचे महत्त्व ध्यानात येते.

पत्रकार संघात होणारी व्याख्याने, वार्तालाप याखेरीज नवीन व तरुण पत्रकारांसाठी अभ्यास शिबिरेही पत्रकारांसाठी घेण्यात येतात. असेच एक शिबीर ७,८ व ९ फेब्रुवारी १९८१ रोजी पत्रकार संघाने आयोजित केले होते. अशा प्रकारे तीन दिवसाचे शिबीर घेण्यास आरे येथील न्यूझीलंड होस्टेलची जागा निवडण्यात आली. या शिबिरासाठी महाराष्ट्रातून ११० युवक पत्रकार आले होते. त्यात १४ युवती होत्या. या शिबिरार्थींचा निवास व भोजनाचा खर्च पत्रकार संघाने केला हे या शिबिराचे वैशिष्ट्य होते. त्यामुळे शिबिरार्थींना आपल्या गावाहून येण्याजाण्याचाच फक्त खर्च करावा लागला. पत्रकारांच्या आठवणीत प्रदीर्घ काळ रहावे असे हे शिबीर झाले होते.

   

पत्रकार संघ इतिहास  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com