क्रीडा पत्रकारांसाठी पुरस्कार दिला जाणार..

ज्येष्ठ पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देशी खेळांवर लिहिणा-या क्रीडा पत्रकारांसाठी पुरस्कार दिला जाणार आहे. त्यासाठी मोरे यांचे ज्येष्ठ पुत्र अश्विन मोरे यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघाला एक लाखाचा धनादेश दिला... लवकरच या पुरस्काराची घोषणा केली जाईल.

सिडकोने पत्रकारांसाठी राखीव असलेल्या
पनवेल येथील भुखंडासंदर्भातील मुदत वाढविण्याविषयी निवेदन..

सिडकोने पत्रकारांसाठी राखीव असलेल्या पनवेल येथील भुखंडासंदर्भातील जाचक अटी रद्द कराव्यात आणि निविदा अर्ज स्विकारण्याची मुदत दि. १० मार्चपर्यंत वाढवावी अशी मागणी करणारे निवेदन मुंबई मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने आज सिडकोचे एमडी श्री. भूषण गगराणी यांना दिले. श्री. गगराणी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. आता पुढील बैठक मा. मुख्यमंत्री यांच्याबरोबर लौकरच होईल. आनंदाची बातमी देखील लौकरच मिळेल. छायाचित्रात डावीकडून कार्यकारिणी सदस्या स्वाती घोसाळकर, अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे , श्री. गगराणी आणि उपाध्यक्ष सुधाकर काश्यप दिसत आहेत.

काळाची गरज ओळखून पत्रकार संघाची
डिजीटल मार्केटींग कॉन्फरन्स : आ. प्रविण दरेकर
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पहिल्या वहिल्या
डिजिटल मार्केटिंग कॉन्फरन्सला उत्स्फूर्त प्रतिसाद`डिजिटल मार्केटिंग ही काळाची गरज असून, ती ओळखून मुंबई मराठी पत्रकार संघाने जी पहिली डिजिटल मार्केटिंग कॉन्फरन्स आयोजित केली आहे तिचे मी मनापासून स्वागत व अभिनंदन करतो व अशा सर्व उपक्रमांना माझा व्यिक्तश: तसेच मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अध्यक्ष या नात्याने सक्रीय पाठिंबा राहिल', असे आश्वासक गौरवोद्गार मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनी शनिवारी, मुंबई मराठी पत्रकार संघात, पत्रकार संघाने आयोजित केलेल्या पहिल्या `डिजिटल मार्केटिंग कॉन्फरन्स'चे उद्घाटन करताना काढले. अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे होते.

यावेळी पत्रकार संघाचे विश्वस्त अजय वैद्य, पत्रकार संघाच्या प्रशिक्षण वर्गाची जबाबदारी सांभाळणारे विजयकुमार बांदल, पत्रकार संघाचे संयुक्त कार्यवाह सुरेश वडवलकर, अनेक ज्येष्ठ पत्रकार तसेच या प्रशिक्षण वर्गाला भरघोस प्रतिसाद दिलेले विविध कार्यक्षेत्रातील प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षक उपस्थित होते.

यावेळी बोलताना ना. श्री. दरेकर पुढे म्हणाले, `स्वानुभव सांगायचा तर मुंबई बँकेच्या संदर्भात वृत्तपत्रांतून अपप्रचार सुरू झाल्यावर आम्ही एसएमएसच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधला व त्याचा सुखद परिणाम असा झाला की आमच्या ठेवी कमी व्हायच्या ऐवजी उलट त्या 7 दिवसांत 60 कोटींनी वाढल्या. तेव्हाच आमच्या लक्षात सोशल मीडियाची ताकद आली व आम्ही त्या दृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करायला सुरुवातही केली आहे. त्याच दृष्टीने आमच्या बँकेच्या काही कर्मचाऱ्यांना आम्ही आवर्जून या परिषदेसाठी पाठवले आहे. याच परिषदेत फक्त विधायक बातम्या, लेख देणाऱ्या `नया भारत' या वेबसाईटचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री मिलींद देवरा यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मिलींद देवरा म्हणाले, `पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी जेव्हा मला या परिषदेबद्दल सांगितले तेव्हा मला आश्चर्य वाटले. कारण पत्रकारितेसमोर सध्या सगळयात मोठे आव्हान हे डिजिटल मिडीयाचे आहे. मात्र ते समजून घेऊन त्याचा मुकाबला करण्याची जी मानसिकता यातून दिसते आहे ती अभिनंदनीय आहे. डिजिटल मीडियामुळे आपल्या देशातली रोजगाराची कल्पना पूर्ण बदलली असून ही एकूणच `गेम चेंजिंग टेक्नॉलॉजी' ठरते आहे.

या वेळी बोलताना पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी ही परिषद आयोजित करण्यामागची भूमिका विशद केली. `या सोशल माध्यमाबद्दल त्रागा करण्यात अर्थ नसून ते लोकांनी अंगिकारले असल्याने आपण ते अंगिकारून त्या दृष्टीने विधायक बदल घडवून आणण्याची गरज आहे' असे प्रतिपादन त्यांनी केले.

या परिषदेत विविध डिजिटल मार्केटिंग कंपन्यांचे कर्तेधर्ते प्रशिक्षण देण्यासाठी उपस्थित होते. त्यात ईमेल मार्केटिंग, क्रिएटिव्ह सर्व्हिसेस, कंटेंटच्या द्वारा उत्पन्न, विविध प्रकारचे कंटेंट, पेड अॅडस्, सर्च इंजिन, लिंकडीन व टि्वटरचा योग्य उपयोग आदी अनेक विषयांवर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी विश्वस्त अजय वैद्य यांनी प्रास्ताविक केले. तर संयुक्त कार्यवाह सुरेश वडवलकर यांनी आभार मानले.

   

संस्थेची अध्यक्ष परंपरा  

 • 001.jpg
 • 00001.jpg
 • 002.jpg
 • 003.jpg
 • 004.jpg
 • 005.jpg
 • 006.jpg
 • 007.jpg
 • 008.jpg
 • 009.jpg
 • 010.jpg
 • 011.jpg
 • 012.jpg
 • 013.jpg
 • 014.jpg
 • 015.jpg
 • 016.jpg
 • 017.jpg
 • 018.jpg
 • 019.jpg
 • 020.jpg
 • 021.jpg
 • 022.jpg
 • 023.jpg
 • 024.jpg
 • 025.jpg
 • 026.jpg
 • 027.jpg
 • 028.jpg
 • 029.jpg
 • 030.jpg
 • 031.jpg
 • 032.jpg
 • 033.jpg
 • 034.jpg
 • 035.jpg
 • 036.jpg
 • 037.jpg
 • 038.jpg
 • 039.jpg
 • 040.jpg
   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com