मुंबई मराठी पत्रकार संघाचा पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम..

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडियासोबत वेब तसेच सोशल मीडियाचा समावेश असलेला पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम येत्या ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार असून त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अभ्यासक्रमासाठी पदवीधर असणाऱ्यांना प्राधान्याने प्रवेश दिला जाणार आहे. तसेच जागेच्या उपलब्धतेनुसार बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांना प्रवेश दिला जाईल. मुंबई मराठी पत्रकार संघाला ७७ वर्षांची परंपरा आहे. पत्रकारितेशी संबंधित असलेल्या तज्ज्ञांचे थेट मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिके, अभ्यासभेटी, खास प्रकल्प हे या अभ्यासवर्गाचे वैशिष्ट्य आहे. अभ्यासक्रम १३ ऑगस्ट २०१८ रोजी सुरू करण्यात येणार आहेत. ज्या अभ्यासक्रमाचे वर्ग शुक्रवार आणि शनिवारी सायं. ६ ते ८ या वेळेत घेतले जातील. ज्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचा असेल त्यांनी दिनांक ११ जुलै, २०१८ पासून कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांत दुपारी १२.०० ते संध्याकाळी ७.०० वाजेपर्यंत मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन, आझाद मैदान, मुंबई - ४०० ००१. येथे प्रत्यक्ष किंवा दूरध्वनी क्र. २२६२०४५१ वर संपर्क साधावा, अधिक माहिती अभ्यासक्रमाचे संचालक श्री. विजयकुमार बांदल (मो. ९८२०८३९६३३) यांच्याशी संपर्क साधल्यास मिळू शकेल.

उत्तर प्रदेशचे राज्यपाल मा. राम नाईक यांची
मुंबई मराठी पत्रकार संघाला सदिच्छा भेट....

WhatsApp Image 2018-07-25 at 11.14.20 AM 1

लोकशाही वाचविण्यासाठी पत्रकारांनी लेखणी धारदार करावी - डॉ.सुधीर गव्हाणे

0mumbai 55देशाला स्वातंत्र्य मिळण्यात पत्रकारांचा फार मोठा सहभाग होता. आजच्या पत्रकारीतेत भाटांचे प्रमाण वाढले आहे आणि हेच लोकशाहीस घातक ठरत आहे.पूर्वी सारखी निर्भेळे पत्रकारिता आता अभावानेच पहायला मिळते.पूर्वी पत्रकारांना फ़क्त चांगली बातमी छापली जावी म्हणून फोन येत असत. आता तर माझी चांगली बातमी छापली पाहिजेच त्याच बरोबर माझ्या विरोधकाची वाईट बातमी आली पाहिजे असे दबावाचे फोन पत्रकारांना येत असतात.

इथेच पत्रकारितेच्या मूल्यांना ईजा होण्यास सुरुवात झाली.असे परखड़ मत माध्यम सल्लागार डॉ.सुधीर गव्हाणे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या 77 व्या वर्धापन दिना निमित्त आयोजीत समारंभात उपस्थितांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.निर्भिडपणे पत्रकारिता करायची तर पोषक वातावरण असावे लागते.हे देशात लोकशाही असल्याचे शुभ संकेत मानले जाते.वंचिताना न्याय मिळणे हा लोकशाहीचा प्राण आहे,आत्मा आहे.हिच लोकशाहिची खरी व्याख्या आहे. या देशात सत्य काय आहे हे सांगणारी पत्रकारिता जगली पाहिजे,जिवंत राहिली पाहिजे.तरच लोकशाही जगेल आणि देश वाचेल.पत्रकारांनी लोकशाही टिकविण्यासाठी आणि वाचविण्यासाठी लेखनी धारदार केली पाहिजे.

   

संस्थेची अध्यक्ष परंपरा  

 • 001.jpg
 • 00001.jpg
 • 002.jpg
 • 003.jpg
 • 004.jpg
 • 005.jpg
 • 006.jpg
 • 007.jpg
 • 008.jpg
 • 009.jpg
 • 010.jpg
 • 011.jpg
 • 012.jpg
 • 013.jpg
 • 014.jpg
 • 015.jpg
 • 016.jpg
 • 017.jpg
 • 018.jpg
 • 019.jpg
 • 020.jpg
 • 021.jpg
 • 022.jpg
 • 023.jpg
 • 024.jpg
 • 025.jpg
 • 026.jpg
 • 027.jpg
 • 028.jpg
 • 029.jpg
 • 030.jpg
 • 031.jpg
 • 032.jpg
 • 033.jpg
 • 034.jpg
 • 035.jpg
 • 036.jpg
 • 037.jpg
 • 038.jpg
 • 039.jpg
 • 040.jpg
   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com