उद्दिष्टे

  • सर्व पत्रकारांना मूलभूत हक्क मिळवून देणे.
  • पत्रकारांसाठी डिजिटल प्रशिक्षण उपलब्ध करून देणे.
  • विविध विषयावर कार्यशाळा आयोजित करणे.
  • प्रत्येक पत्रकार सदस्यांना २ लाखांची मोफत इन्शुरन्स पॉलिसी काढून देणे.
  • प्रेस नोट व प्रेस कॉन्फेरंस संपूर्ण भारतीयांसाठी सहज, सोप्या पद्धतीने आणि अल्प दरात ऑनलाईन उपलब्ध करणे.
  • प्रत्येक शहरातील प्रस्तावित कार्यक्रमांची माहिती वेबसाईट आणि मोबाइल अँपवर प्रकाशित करणे.
  • पत्रकार व इतर नागरिकांसाठी शासकीय आणि निमशासकीय लाभ आणि सवलतीसाठी प्रयत्न करणे.
  • पत्रकारिता आणि इतर विविध क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कृत करून त्यांचे मनोबल वाढविणे.
  • विविध तांत्रिक शिक्षणासाठी शिक्षण संस्थांची स्थापना करणे.
  • दुर्गम भागात व गरजू लोकांसाठी धर्मादाय आरोग्य संस्थांची स्थापना करणे.
  • पत्रकारिता आणि इतर क्षेत्रातील कॅन्सर अथवा गंभीर आजार किंवा अपघाती आजारी लोकांना आरोग्य सेवा व निधी उपलब्ध करून देणे.
  • केंद्र सरकार आणि विविध राज्यांच्या व इतर कल्याणकाकरी योजनांचा प्रचार व प्रसार करणे.
  • पत्रकारितेच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आणि युवतींच्या उन्नती आणि प्रगतीसाठी विशेष योजनांचा पाठपुरावा करणे.
  • गरीब व निर्धन विद्यार्थांसाठी शैक्षणिक सामुग्री आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे.
  • स्वास्थ्य, जनजागरण, शिक्षण, खेळ व विविध क्षेत्रातील कार्यक्रमांचे आयोजन करणे आणि विशेष कामगिरी करणार्यांना पुरस्कृत व प्रोत्साहित करणे.
  • पत्रकारिता आणि इतर क्षेत्रातील विशेष योगदान असलेल्या व्यक्तींच्या मरणोत्तर त्यांच्या कुटुंबियांना मदत करणे व मनोबल वाढविणे.
  • संपूर्ण भारत देशातील पत्रकार, पत्रकारितेशी निगडित व इतर संबंधित पुरुष व महिलांना ऑनलाईन पत्रकार संघाचे सन्मानित सदस्य बनविणे.
  • पत्रकारिता आणि इतर विभिन्न क्षेत्रातील नागरिकांचे विशेष तज्ञ लोकांच्या मदतीने बौद्धिक आणि मानसिक विकास करणे.
  • पत्रकारिता आणि इतर विभिन्न क्षेत्रातील नागरिकांचे तंत्रज्ञान व इंटरनेटच्या माध्यमातून उत्पन वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.
  • विविध तांत्रिक आणि कल्याणकारी उद्योग धंदयांचा प्रचार व प्रसार करणे.
  • एक देश एक पत्रकार संघ ही संकल्पना विद्यार्थी पत्रकार, पत्रकार, पत्रकार संस्था आणि नागरिकांध्ये रुजविण्याचा प्रयत्न करणे.